शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मिनरल वॉटर कंपन्यांना अभय

By admin | Updated: April 11, 2016 00:49 IST

शहरामध्ये बेकायदेशीरपणे महापालिकेच्या पाण्याची चोरी करून, बेकायदेशीरपणे टँकर घेऊन पाण्याची विक्री करणाऱ्या मिनरल वॉटर कंपन्यांना महापालिकेच्या प्रशासनाचेच अभय असल्याचे स्पष्ट झालेले आहे

पुणे : शहरामध्ये बेकायदेशीरपणे महापालिकेच्या पाण्याची चोरी करून, बेकायदेशीरपणे टँकर घेऊन पाण्याची विक्री करणाऱ्या मिनरल वॉटर कंपन्यांना महापालिकेच्या प्रशासनाचेच अभय असल्याचे स्पष्ट झालेले आहे. मिनरल वॉटर कंपन्यांविरुद्ध पुराव्यानिशी तक्रार होऊन १५ दिवस उलटले तरी अद्याप त्यांच्याविरुद्ध पाणीपुरवठा विभागाकडून कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.शहरामध्ये ८५ मिनरल वॉटर कंपन्यांकडून बेकायदेशीरपणे प्लांटची उभारणी करून पाण्याची विक्री केली जात आहे. या कंपन्यांनी एफडीएकडे त्यांची नोंदणी केलेली नाही, त्यांच्या पाण्याच्या दर्जाची तपासणी केली जात नाही. कोणतेही निकष न पाळता पाणी बाटलीबंद करून त्यांची शहरामध्ये तसेच शहराबाहेर विक्री केली जात आहे. या कंपन्यांविरुद्ध रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे गटनेते सिद्धार्थ धेंडे यांनी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, तक्रार करून १५ दिवस उलटले तरी अद्याप त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा तपशील पाणीपुरवठा विभागाकडून जाहीर करण्यात आलेला नाही. शहराच्या पाण्यात ३० टक्के कपात करून एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाण्याचा गैरवापर सुरू असल्यास दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र, दुसरीकडे मिनरल वॉटरची विक्री करणाऱ्या कंपन्या चोरून कनेक्शन घेऊन तसेच टँकर खरेदी करून पाण्याचा वापर करीत आहेत. शहरामध्ये हॉटेल व्यावसायिक तसेच इतर व्यावसायिक कारणासाठी पाणी हवे असेल तर महापालिकेकडून पर हजार लिटर ३३ रुपये दराने पाणी उपलब्ध करून दिले जाते. मिनरल वॉटर कंपन्यांनी या दराने पाणीखरेदी करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात ते टँकर, बोअरवेल, विहिरीच्या पाण्याचा वापर करीत आहेत. कंपन्यांची यादी, पत्ते, पाण्याचा गैरवापर होत असल्याचे व्हिडीओ सिद्धार्थ धेंडे यांनी पाणीपुरवठा विभागाला देऊनही अद्याप त्यांच्यावर काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे प्रशासनाकडूनच या कंपन्यांना अभय मिळाला असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.अन्न व औषध प्रशासनाने अशा नोंदणी नसलेल्या कंपन्या शोधून त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित असतानाही त्यांच्याकडून मिनरल वॉटर कंपन्यांकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.