शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

लाखो मराठा बांधवांची मुंबईकडे कूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 03:34 IST

पुण्यातील मोर्चा अभुतपूर्व यशस्वी करून दाखवल्यानंतर मुंबईतील मोर्चातही यशस्वी कूच करण्याचे मराठा मोर्चा समन्वय समितीने ठरविले आहे. सुमारे एक लाख पुणेकर मोर्चात सहभागी होणार असल्याचा विश्वास मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. कोपर्डी घटनेतील दोषीआरोपींना तत्काळ फाशी द्या, शेतकºयांच्या कर्जमाफीसह मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी क्रांतिदिनी सकल ...

पुण्यातील मोर्चा अभुतपूर्व यशस्वी करून दाखवल्यानंतर मुंबईतील मोर्चातही यशस्वी कूच करण्याचे मराठा मोर्चा समन्वय समितीने ठरविले आहे. सुमारे एक लाख पुणेकर मोर्चात सहभागी होणार असल्याचा विश्वास मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. कोपर्डी घटनेतील दोषीआरोपींना तत्काळ फाशी द्या, शेतकºयांच्या कर्जमाफीसह मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी बुधवारी क्रांतिदिनी सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, भोर, वेल्हा, मुळशी व पुरंदरमधील बहुतांश लोक मुंबईतच रोजगारानिमित्त स्थयिक आहेत. ते मराठा बांधवांची व्यवस्था करीत आहेत. मंगळवारी सकाळीही अनेक लोक रेल्वेने रवाना झालेआहेत. दिवसभरात मुंबईकडे जाणाºयांचा ओघ सुरूच होता. बुधवारी सकाळी डेक्कन क्वीन, सह्याद्री, प्रगती एक्सप्रेसने मोर्र्चेकरी मुंबईत रवाना होणार असल्याचे कुंजीर यांनी सांगितले. सहभागी सर्वांनी मोर्चाची आचारसंहिता काटेकोरपणे पाळावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.मार्गावर ठिकठिकाणी खानपानाची व्यवस्थासातारा, सोलापूर, नगर रस्त्याने मुंबईकडे जाणाºया समाजबांधवांसाठी मार्गात ठिकठिकाणी चहा, नाश्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अनेक ग्रामस्थ, मराठा संघटना, सामाजिक संघटनांनीही त्यासाठी पुढाकार घेतला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर, बेळगाव याभागातून येणाºयांसाठी भोरच्या अलीकडे आराम हॉटेल येथे, सोलापूर मार्गावर हडपसरमध्ये, एक्स्प्रेसवेपूर्वी समीर लॉन्स येथे तर जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कार्ले, वडगाव मावळ व देहूरोड या ठिकाणी ही व्यवस्था असेल.1 पुणे, सोलापूर या भागातून जाणाºया वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था खारघर येथे करण्यात आली आहे. तसेच याभागातील सेंट्रल पार्क, सरस्वती कॉलेज, लिटील वर्ल्ड मॉलमागे सुमारे १० हजार वाहनांच्या पार्किंगचे नियोजन करण्यात आले असून त्यानुसार जागा निश्चित करण्यात आली आहे. तसेच इस्टर्न फ्रीवेवरील बीपीटी मैदानावरही पार्किंग केली जाणार आहे.2मोर्चाच्या मुंबईतील नियोजनासाठी २५ हजार स्वयंसेवकांची नेमणूक करण्यात आली असून त्यातील अडीच हजार स्वयंसेवक जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यात दहा हजार झेंडे, पाच हजार बॅनर, विविध मागण्यांचे तीन हजार फलक, ३ लाखांहून अधिक स्टीकर्स, पाच लाख पत्रकांचे वाटप करण्यात आले आहे.मंचर शहरातून रॅलीमंचर : सकल मराठा समाजाच्या वतीने मंचर शहरातून आज दुचाकी रॅली काढण्यात आली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुचाकीला भगवे झेंडे बांधून व टी-शर्ट, डोक्यावर टोपी घालून तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दत्ता थोरात, शरदराव पोखरकर, अ‍ॅड. सुनील बांगर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजीमहाराजांच्या पुतळ््याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. सांगता कार्यक्रमात पुणे जिल्हा समन्वयक शरद पोखरकर, वसंतराव बाणखेले, सुनील बांगर, श्रद्धा खैरे यांनी मनोगत व्यक्त केले. शिरूरमुंबई येथे उद्या (दि. ९) आयोजित मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी शहर व तालुक्यातून ५०० हून अधिक वाहनांचे नियोजन करण्यात आले आहे. यात प्रत्येक गावातून युवक, तरुण व प्रौढ मराठा बांधवांनी गावनिहाय नियोजन केले आहे.हवेलीतालुक्यातून ८ हजार मराठा बांधव मुंबई येथे जाणार असल्याची माहिती मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष गुलाब गायकवाड यांनी दिली. हवेली तालुक्याला महामार्ग किंवा रेल्वेने मुंबईजवळ असल्याने हवेलीतून जास्त कार्यकर्ते मोर्चात सहभागी होणार आहेत.जुन्नरतालुक्यातून २५ हजार मराठा बांधव सामील होणार आहेत़ या मोर्चात स्वयंस्फूर्तीने सहभागी होण्यासाठी रवाना झालेले असून महिलांचादेखील समावेश असणार आहे, अशी माहिती मराठा क्रांतीचे जिल्हा समन्वयक रमेश हांडे यांनी दिली़ जुन्नरतालुक्यातून सुमारे १५० ते २०० गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे.बारामतीशहर, तालुक्यातुन जवळपास २५ हजार मराठा समाजबांधव निघाले आहेत. रेल्वे, एसटी बससह खासगी वाहनांनी सर्वजण रवाना झाले आहेत. ५०० बस, चारचाकी वाहनांंमधुन, ७०० दुचाकीवर मुंबईच्या दिशेने सर्वजण मंगळवारी सायंकाळी रवाना झाले आहेत.खेडतालुक्यातुन मुंबई येथे होणाºया मराठा क्रांती मोर्चासाठी बुधवार (दि.९ ) रोजी खेड, आळंदी, चाकण या शहरातून पाच हजार नागरिक जाणार आहेत. मोचार्साठी जाणा-या नागरिकांसाठी पहाटे ४ वाजता एसटी बसेस ठेवण्यात आल्या असल्याची माहिती अमित कुमार टाकळकर यांनी दिली.दौंडतालुक्यातून कार्यकर्ते मोठ्या संख्येने रवाना होणार असल्याची माहिती दौंड तालुका मराठा महासंघाचे अध्यक्ष दादासाहेब नांदखिले, शहराध्यक्ष उमेश वीर आणि जिल्हा संघटक विक्रम पवार यांनी माहिती दिली. साधारणत: बहुतांशी कार्यकर्ते पहाटेपासूनच रेल्वेने मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. तर खाजगी वाहनांचीदेखील व्यवस्था करण्यात आली होती. त्यानुसार १८ मोठ्या लक्झरी, पाचशेच्या जवळपास छोट्या चारचाकी गाड्या अशी वाहनांची संख्या आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा