शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दूध उत्पादकांचे सव्वादोनशे कोटी रुपयांचे अनुदान थकले- राजू शेट्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2018 02:42 IST

थकबाकी न दिल्यास दूध अनुदान योजनेतून बाहेर पडणार

पुणे : दुष्काळ आणि चाराटंचाईमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर जनावरे विक्रीस काढत असल्याने जनावरांना भाव मिळत नाही, तर दुसरीकडे दुधाचे सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळातील दोनशे ते सव्वादोनशे कोटी रुपयांचे अनुदान सरकारने थकवल्याने काही दूध उत्पादक संघांनी उत्पादकांना कमी दर देण्यास सुरुवात केली आहे. सरकारने येत्या ११ डिसेंबरपर्यंत अनुदानाची रक्कम देण्याबाबत पावले न उचलल्यास सरकारच्या अनुदान योजनेतून बाहेर पडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिला.दुधाला भाव मिळत नसल्याने ‘स्वाभिमानी’सह विविध शेतकरी संघटनांनी जुलै महिन्यात दूध बंद आंदोलन केले होते. त्यानंतर राज्य सरकारने दुधाला प्रतिलिटर ५ रुपयांचे अनुदान जाहीर केले. त्यामुळे दूध उत्पादकांना लिटरमागे २५ रुपयांचा भाव दिला होता. आॅगस्ट महिन्यात राज्य सरकारने दीडशे कोटी रुपयांचे अनुदान दूध संघ व खासगी डेअरीला दिले. काही दूध उत्पादक संघांना सप्टेंबर महिन्याच्या दोन आठवड्यांचे अनुदान मिळाले आहे. त्यानंतर कोणालाच अनुदान मिळाले नाही.दूध उत्पादक संघ माहिती देत नसल्यात नाही तथ्यशेट्टी म्हणाले, दुधाला अनुदान देण्यात चालढकल होत आहे. त्यामुळे सोलापूर आणि अहमदनगर येथील दूध उत्पादक संघांनी २० रुपये लिटरप्रमाणेच उत्पादकांना पैसे देण्यास सुरुवात केली आहे, तर उर्वरित ५ रुपये सरकारचे अनुदान जमा झाल्यानंतर देऊ, असे सांगितले जात आहे. सरकार एकीकडे पुरेसा निधी असल्याचे सांगत आहे. उलट दूध उत्पादक संघच माहिती देत नसल्याने अनुदान रखडल्याचे सरकार म्हणते. मात्र, त्यांच्या या दाव्यात तथ्य वाटत नाही.दुष्काळाच्या स्थितीमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर जनावरे विक्रीस काढत असल्याचे चित्र जनावरांच्या बाजारात दिसून येत आहे. मागणीच्या तुलनेत जनावरे विक्रीसाठी अधिक उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना किंमत मिळत नाही, तर सध्या दुधाचे चांगले उत्पादन होत आहे. त्यातच अनुदान मिळत नसल्याने शेतकरी दुहेरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. सरकारने वेळच्या वेळेत अनुदान न दिल्यास या योजनेतून बाहेर पडू, असे शेट्टी म्हणाले.

टॅग्स :milkदूधRaju Shettyराजू शेट्टी