शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाढीव दूधदराबाबत साशंकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 20:41 IST

दूधदरवाढ आंदोलन चिघळल्यानंतर नरमाईची भूमिका घेऊन पावसाळी अधिवेशनात १९ जुलै रोजी राज्य शासनाने गाईच्या दूध खरेदी दरामध्ये २५ रुपयांपर्यंत वाढ केली.

ठळक मुद्देदुधासाठी दिलेल्या वाढीव दराबाबत सहकारी व खासगी दूध संघांची मनमानी राहणारदूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान जमा करायची जबाबदारी सहकारी संघांची

बारामती : गाईच्या दुधाला बुधवार (दि. १) पासून २५ रुपये दर दिला जाईल, असे राज्य शासनाने १९ जुलै रोजी पावसाळी अधिवेशनात जाहीर केले होते. मात्र, याबाबतचा अध्यादेश अजूनपर्यंत सहकारी व खासगी संस्थांना मिळालेलाच नसल्याचे समोर आले आहे. तसेच, इंदापूर तालुक्यात खासगी दूध संस्थांनी १ आॅगस्ट रोजी खरेदी केलेल्या दुधाच्या पावत्यादेखील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिल्या नसल्याने वाढीव दूधदराबाबत साशंकता असून, दूधदराची कोंडी फुटली नसल्याचे चित्र आहे.गेल्या महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभरातील शेतकऱ्यांना दूध बंद आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाला राज्यभरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी प्रतिसाद देऊन ठिकठिकाणी दूध दरवाढ आंदोलन केले. दूधदरवाढ आंदोलन चिघळल्यानंतर नरमाईची भूमिका घेऊन पावसाळी अधिवेशनात १९ जुलै रोजी राज्य शासनाने गाईच्या दूध खरेदीदरामध्ये २५ रुपयांपर्यंत वाढ केली. मात्र, यामध्येदेखील अटी-शर्ती लादून सहकारी संघ व प्रक्रिया उद्योगांच्या भरवशावरच दूध उत्पादक शेतकऱ्याला ठेवले. राज्य शासनाने सहकारी व खासगी दूध संस्थांनी उत्पादित केलेल्या पिशवीबंद दुधाला अनुदान नाकारले. तर, पिशवीबंद दूध वगळून उर्वरित दुधाला राज्य शासनाकडून ५ रुपये प्रतिलिटर अनुदान १ आॅगस्टपासून देण्याचे जाहीर केले. दूध पावडर व इतर दुग्ध उत्पादनांना हे अनुदान मिळणार आहे. तसेच ज्या खासगी संस्था वा सहकारी संघ ५ रुपये प्रतिलिटर अनुदानाचा लाभ घेतील त्यांना दूध पावडर निर्यातीला अनुदान दिले जाणार नसल्याचेही शासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे अनुदानाचा लाभ संस्था घेणार की दूध उत्पादकाला अनुदान देणार, हा आगामी काळात कळीचा मुद्दा होणार आहे. तसेच, याबाबतचा अध्यादेशच अद्यापही सहकारी संघ व खासगी संस्थांना मिळालेला नसल्याने १ आॅगस्टपासून मिळणाऱ्या वाढीव दराचा फायदा खरेच दूध उत्पादक शेतकºयांना होणार का? याबाबत शंका व्यक्त होऊ लागली आहे..................२५ रुपये दराप्रमाणे खरेदी केलेल्या दुधालाच शासनाकडून आनुदान मिळणार आहे. ज्या सहकारी व खासगी दूध संस्था दूध उत्पादक शेतकऱ्याचे दूध २५ रुपये दराने खरेदी करणार नाहीत, त्यांना शासनामार्फत अनुदानाची रक्कम मिळणार नाही. 

.................................एखाद्या संस्थेने शासकीय अध्यादेश पाळला नाही, तर त्याचा थेट परिणाम त्या संस्थेला दूध घालणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यावर होणार आहे. तसेच, शासन असेही म्हणते, की शासकीय खरेदी दराप्रमाणे दूध खरेदी केली नाही, तर संबंधित संस्थेवर कारवाई केली जाईल. याचा अर्थ, दुधासाठी दिलेल्या वाढीव दराबाबत सहकारी व खासगी दूध संघांची मनमानी राहणार आहे. यापूर्वी तत्कालीन दुग्धविकासमंत्री एकनाथ खडसे यांचा २७ रुपये प्रतिलिटर दूध खरेदीदराचा अध्यादेश खासगी व सहकारी दूध संस्थांनी धुडकावला होता. खडसे यांची कारवाईची घोषणा पोकळच ठरली होती. या वेळीदेखील शासनाने अशा संस्थांवर काय कारवाई करणार, हे मात्र स्पष्ट केलेले नाही. त्यामुळे कारवाई करण्याची घोषणा पोकळ ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे...................बारामती सहकारी दूध संघ खासगी प्रक्रिया उद्योगांना दूध देतो. राज्य शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाबाबत प्रक्रिया उद्योगाबरोबर चर्चा करून, दूध उत्पादक शेतकऱ्याला अनुदान द्यावे लागेल, अशी माहिती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली. यावर बारामती तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी शंका व्यक्त करताना सांगितले, की प्रक्रिया उद्योग थेट आमच्याकडून दूध खरेदी करीत नाहीत. तसेच, दूध पावडरच्या निर्यातीला जर प्रक्रिया उद्योगांनी अनुदान घेतले, तर दूध उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान जमा करायची जबाबदारी सहकारी संघांची राहील की प्रक्रिया उद्योगांची, हे स्पष्ट होत नाही.  

टॅग्स :PuneपुणेmilkदूधGovernmentसरकार