शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

मिहिरने मोडला वीरधवलचा विक्रम

By admin | Updated: July 6, 2017 03:37 IST

महाराष्ट्राच्या मिहिर आंब्रेने ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मुलांच्या १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून ५५.६५ सेकंद वेळ नोंदवून

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महाराष्ट्राच्या मिहिर आंब्रेने ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत मुलांच्या १०० मीटर बटरफ्लाय प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करून ५५.६५ सेकंद वेळ नोंदवून वीरधवल खाडेचा ९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढून सुवर्णपदक संपादन केले. तर दुसरीकडे, कर्नाटकाच्या तनिश मॅथ्यूने गोव्याच्या झेविअर डिसूझाचा २०१५चा विक्रम मोडून सुवर्णपदक पटकावले. महाराष्ट्राच्या त्रिशा कारखानीस, साध्वी धुरी व केनिशा गुप्ता यांनी सुवर्णपदक पटकावले.भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेच्या वतीने म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुलातील जलतरण तलावावर सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलंच्या १५ ते १७ वयोगटातील १०० मी. बटरफ्लाय प्रकारात मिहिरने ५५.६५ सेकंद वेळ नोंदवून २००८मध्ये (९ वर्षांपूर्वी) वीरधवल खाडेने नोंदविलेला ५५.९६ सेकंदांचा विक्रम मोडीत काढला. याच गटात ५० मी. फ्रीस्टाईल प्रकारात मिहिरने आपल्या सुवर्ण कामगिरीत सातत्य राखत २४.४१ सेकंदांसह सुवर्णपदक संपादन केले. तर, मुलांच्या १३-१४ वयोगटात कर्नाटकाच्या तनिश मॅथ्यूने ५८.३७ सेकंद वेळ नोंदवून गोव्याच्या झेविअर डिसूझाचा २०१५चा ५९.२३ सेकंदांचा विक्रम मोडीत काढून सुवर्णपदक जिकंले. मुलींच्या १३-१४ वयोगटातील ८०० मी. फ्रीस्टाईल प्रकारात कर्नाटकाच्या खुशी दिनेशने ९.४२.१२ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक आपल्या नावावर केले.मुलींच्या १५-१७ वयोगटात महाराष्ट्रच्या त्रिशा कारखानीसने २०० मी. बटरफ्लाय प्रकारात २.२४.४६ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक संपादन केले. याच गटात महाराष्ट्राच्या त्रिशा कारखानीसने १०० मी. बॅकस्ट्रोक प्रकारात १.०७.९० सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. मुलींच्या १५-१७ वयोगटात ५० मी. फ्रीस्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या साध्वी धुरीने २७.८९ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक संपादन केले. मुलींच्या १३-१४ वयोगटात महाराष्ट्रच्या केनिशा गुप्ताने आपल्या सुवर्ण कामगिरीत सातत्य राखून २७.९४ सेकंद वेळेसह स्पर्धेतील चौथे सुवर्णपदक संपादन केले. महाराष्ट्राच्याच नील रॉयने २४.५७ सेकंदांसह रौप्यपदक पटकावले. दिल्लीच्या समीत सेजवालने २४.६३ सेकंद वेळ नोंदवून कांस्यपदक पटकावले. मुलांच्या १३-१४ वयोगटात तमिळनाडूच्या विकास पी.ने २४.७६ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक संपादन केले. तर, हरियाणाचा वीर खाटकर व कर्नाटकाचा प्रसिधा कृष्णा यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्य पदक पटकावले.सविस्तर निकाल : ८०० मी. फ्रीस्टाईल मुली (१३-१४ वयोगट)- खुशी दिनेश (कर्नाटक, ९.४२.१२ से.), पूजिता मूर्ती (कर्नाटक, १.४७.७७ से.), आस्था चौधरी (आसाम, ९.४८.६७ से.); २०० मी. बटरफ्लाय मुली (१५-१७ वयोगट)- त्रिशा कारखानीस (महाराष्ट्र, २.२४.४६ से.), फिरदुश कयामखानी (राजस्थान, २.३२.२५ से.), अनुभूती बरूआ (आसाम, २.३२.३७ से.); २०० मी. बटरफ्लाय मुली (१३-१४ वयोगट)- साची जी. (कर्नाटक, २.३३.५२ से.), रिंकी बोरदोलोई (दिल्ली, २.३३.६८ से.), सई पाटील (महाराष्ट्र, २.३६.७१ से.); १०० मी. बॅकस्ट्रोक मुली (१५-१७ वयोगट)- त्रिशा कारखानीस (महाराष्ट्र, १.०७.९० से.), प्रत्येशा राय (ओडिशा, १.०९.११ से.), झानती राजेश (कर्नाटक,न१.०९.५२ से.); १०० मी. बॅकस्ट्रोक मुली (१३-१४ वयोगट)- तनिषा मावीया (दिल्ली, १.०७.७७ से.), सुवाना भास्कर (कर्नाटक, १.०८.९५से), शृंगी बांदेकर(गोवा,१.०९.३१से); १००मी बटरफ्लाय मुले (१५-१७ वयोगट)- मिहिर आंब्रे (महाराष्ट्र,५५.६५से.), झेविअर डिसूझा (गोवा,५७.१७स.े), राहुल एम. (कर्नाटक, ५७.५८से.); १०० मी. बटरफ्लाय मुले (१३-१४ वयोगट)- तनिश मॅथ्यू (कर्नाटक, ५८.३७ से.), प्रसिधा कृष्णा (कर्नाटक, ५९.५५ से.), परम बिरथारे (मध्य प्रदेश, १.००.५६ से.); ५० मी. ब्रेसस्ट्रोक मुली (१५-१७ वयोगट)- आलिया सिंग (उत्तर प्रदेश,३५.४७से.), सलोनी दलाल(कर्नाटक, ३५.५९से), रिद्धी बोहरा (कर्नाटक, ३५.६७ से.); ५० मी. ब्रेस्टस्ट्रोक मुली (१३-१४ वयोगट)- अदिती बालाजी (तमिळनाडू,३६.६९से.), मधुरा बी.जी. (कर्नाटक,३७.०५से.),रचना राव (कर्नाटक, ३७.३१से.); ५०मी ब्रेस्टस्ट्रोक मुले (१५-१७ वयोगट)- दानुष एस. (तमिळनाडू, ३०.७६से), मानव दिलीप (कर्नाटक, ३०.९१से), मिलांथो दत्ता (आसाम, ३१.०२से); ५० मी ब्रेसस्ट्रोक मुले (१३-१४ वयोगट)- स्वदेश मोंडल (पश्चिम बंगाल, ३३.०७से), अथिश एम. (तमिळनाडू,३३.७९से), हितेन मित्तल (कर्नाटक, ३३.८१से.); ५०मी. फ्रीस्टाईल मुली (१५-१७ वयोगट)- साध्वी धुरी (महाराष्ट्र, २७.८९से), प्रीती बी. (तमिळनाडू, २८.१३से), अ‍ॅनी जैन (मध्य प्रदेश, २८.१६से); ५० मी. फ्रीस्टाईल मुली (१३-१४ वयोगट)- केनिशा गुप्ता (महाराष्ट्र, २७.९४से), लायाना उमेर (केरळ, २८.६०से), माही राज (बिहार, २८.६०से), ५० मी. फ्रीस्टाईल मुले (१५-१७ वयोगट)- मिहिर आंब्रे (महाराष्ट्र, २४.४१से), नील रॉय (महाराष्ट्र, २४.५७से), समीत सेजवाल (दिल्ली, २४.६३से.); ५० मी. फ्रीस्टाईल मुले (१३-१४ वयोगट)- विकास पी. (तमिळनाडू, २४.७६से), वीर खाटकर (हरियाणा, २५.७४से.), प्रसिधा कृष्णा (कर्नाटक, २५.९१ से.)