शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

#MeToo ते #WeToo - तीचा बुलंद आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 01:24 IST

महिलाशक्तीच्या अविष्काराची ओळख बनलेल्या ‘लोकमत विमेन समीट’चे सातवे पर्व शुक्रवारी (२६ आॅक्टोबर) होणार आहे.

पुणे : महिलाशक्तीच्या अविष्काराची ओळख बनलेल्या ‘लोकमत विमेन समीट’चे सातवे पर्व शुक्रवारी (२६ आॅक्टोबर) होणार आहे. ‘#MeToo ते ##WeToo तीची बोलण्याची ताकद’ ही या विमेन समीटची यंदाची संकल्पना आहे. युनिसेफच्या सहयोगाने होणाऱ्या या समीटमध्ये होणाºया चर्चेत मीटू चळवळीला बळ देत ‘ती’ची बोलण्याची ताकद वाढवितानाच समाजाच्या सहभागातून या चळवळीचे स्वरूप ‘वुई टुगेदर’ करण्यासाठी विचारमंथन होणार आहे.मादागास्करच्या भारतातील राजदूत मेरी लिओन्टाईन रझानाद्रासोवा, प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी, राधिका आपटे, तनुश्री दत्ता, यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षाडॉ. उषा काकडे, प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापक पद्मश्री सुधा वर्गिस, कनकधारा फाउंडेशनच्या संस्थापकडॉ. लक्ष्मी गौतम, राष्टÑीयमहिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा, शाश्वत विकास आणि जलव्यवस्थापन तज्ज्ञ रूपाली देशमुख, युनिसेफच्या जेंडर स्पेशालिस्ट अंतरा गांगुली,गुलाबी गॅँगच्या संस्थापक संपत पाल देवी, आशियातील पहिली महिला टॅक्सी संघटना फॉरचीच्या संस्थापक रेवती रॉय, भारतातील सर्वांत तरुण सरपंच जबना चौहान, उद्योजिका आणि युनायटेड नेशन्सच्या यंग अचिव्हर मानसी किर्लोस्कर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती असेल. लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा अध्यक्षस्थानी असतील.महिलांच्या प्रश्नांचे स्वरूप वैश्विक आहे. महिलांनी विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध केले. तरीसुद्धा दिवसेंदिवस त्यांच्यावरील अत्याचारांत वाढ होत आहे. कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक शोषणासारख्या घटना घडत आहे. महिलांसाठी असुरक्षित वातावरण तयार होत आहे. पण अंधार दाटल्यासारखा वाटत असताना ‘मीटू’ ही चळवळीसारख्या किरण शलाका निघत आहे. पण त्यापुढे जाऊन ‘वुईटू’ म्हणत समाजानेही या प्रश्नांकडे सजगपणे पाहण्यासाठी वातावरण तयार व्हायला हवे. यासारख्या विविध विषयांवर या परिषदेत चर्चा होणार आहे.गेली ६ वर्षे सातत्याने महिला सक्षमीकरणाची चळवळ उभी करणाºया कर्तबगार महिला या राष्ट्रीय परिषदेत सहभागी झाल्या आहेत. याच यशोगाथेचा पुढील टप्पा म्हणून स्त्रीत्वाचा अनोखा आविष्कार यंदाच्या ‘विमेन समीट’मध्ये अनुभवायला मिळणार आहे.लोकमत विमेन समीटच्या निमित्ताने आपल्या प्रतिक्रिया ‘लोकमत’च्या अधिकृत ट्विटर हॅँडलवर (@MiLokmat) वर व्यक्त करा आणि #LokmatWomenSummit वर टॅग करा.या परिषदेत सहभागी होण्यासाठी ५ हजार रुपये नोंदणी शुल्क आहे. नोकरदार महिला आणि विद्यार्थिनींना ५० टक्के सवलत आहे.सहभागी होण्यासाठी सहभागासाठी संपर्क करा : 9172109047,Email : rucha.bakre@lokmat.com येथे संपर्क साधावा. प्रवेश फक्त निमंत्रितांसाठी आहे.लोकमत विमेन समीटच्या निमित्ताने राज्यस्तरीय सखी सन्मान पुरस्कारांचे वितरण यावेळी होणार आहे.

टॅग्स :Metoo Campaignमीटू