शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

#MeToo: ‘गुड टच, बॅड टच’ मोहिमेने महिला सक्षमीकरणाला बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 01:22 IST

लोकमत विमेन समीटचे हे सातवे पर्व. ‘तीची बोलण्याची ताकद’ ही संकल्पनाच क्रांतिकारी आणि समयोचित आहे.

- डॉ़ उषा काकडेलोकमत विमेन समीटचे हे सातवे पर्व. ‘तीची बोलण्याची ताकद’ ही संकल्पनाच क्रांतिकारी आणि समयोचित आहे. लोकमत वुमेन समीटच्या निमित्ताने देशभरातील कर्तृत्ववान महिलांना एकत्र आणून त्यांच्या विचारांचा जागर घडवून आणत आहेत. आजपर्यंत या वुमेन समीटच्या माध्यमातून अनेक विषयांवर चर्चा घडली. विचारमंथन झाले.‘लोकमत वुमेन समीट’ने गेल्या सहा वर्षांत महिलांच्या विविध प्रश्नांना व्यासपीठ दिले. अनेक विषयांवर चर्चा घडली. विचारमंथन झाले. नोकरदार महिलांच्या प्रश्नांपासून कर्तृत्वाचे शिखर सर करणाऱ्या हिरकणींपर्यंत अनेक विषय हाताळले गेले. त्याचबरोबर काही कळीच्या प्रश्नांना हात घातला गेला. मंगळसूत्र विकून स्वच्छतागृह उभारणाºया अकोला जिल्ह्यातील महिलांना ‘वुमेन समीट’मुळे व्यासपीठ मिळाले. राज्य पातळीवर हा प्रश्न चर्चिला गेला.महिला बोलत्या झाल्या पाहिजेत, समस्यांना धाडसाने सामोरे गेल्या पाहिजेत, अशा प्रकारचे वातावरण आपण बनविले पाहिजे. लोकमत वुमेन समीटने आजपर्यंत विचारमंथन घडवितानाच प्रश्नांना उत्तरे शोधण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यातून समाजात अनेक सकारात्मक बदल घडले आहेत.त्याचबरोबर, मला आणखी एका विषयाकडे लक्ष वेधावेसे वाटते. अनेक चिमुरड्याही लैंगिक अत्याचारांना बळी पडतात. त्यांना आपल्यावर अत्याचार झाल्याचे कधी-कधी समजतही नाही आणि सांगताही येत नाही. त्यांच्यासाठी यूएसके फाउंडेशन ‘गुड टच, बॅड टच’ मोहीम राबवीत आहे. बाललैंगिक अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अनेकदा बाललैंगिक अत्याचारात घरातील, नात्यातील व्यक्तींचाही समावेश असतो. त्यामुळे मुळात अशा वाईट स्पर्शाचे ज्ञान विशेषत: मुलींना व्हावे, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचार हा गंभीर विषय असून त्याबद्दल जागृती करण्यासाठी मुलांना लहान वर्गांपासूनच धडे दिले पाहिजेत. मुलांना ‘गुड टच, बॅड टच’ची जाणीव व्हावी, यासाठी शाळांनीही प्रशिक्षण वर्ग आयोजित केले पाहिजेत. यूएसके फाउंडेशनने पुण्यातील अनेक शाळांमध्ये यावर जागृती केली. त्यातून अनेक मुली बोलत्या झाल्या. यातून अनेक प्रकार उघडकीस आले आहेत.महिलांच्या प्रश्नांवर राष्टÑीय पातळीवर चर्चा करताना सगळ्या प्रश्नांना विविधांगांनी भिडले पाहिजे. आपण सर्वांनी लोकमत वुमेन समीटच्या माध्यमातून हा प्रयत्न करणे गरजेचे आहे.(अध्यक्ष, यूएसके फाउंडेशन)

टॅग्स :Metoo Campaignमीटू