शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

महिला साह्यता कक्षाकडे पुरुषांच्या तक्रार अर्जांत वाढ, ५९७ अर्ज प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 03:41 IST

दोघांमध्ये किरकोळ वाद, भांडण, मारहाण अशा गोष्टी घडल्या, की महिलांकडून तत्काळ पोलीस ठाण्याची पायरी गाठली जाते किंवा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला जातो.

- नम्रता फडणीसपुणे : दोघांमध्ये किरकोळ वाद, भांडण, मारहाण अशा गोष्टी घडल्या, की महिलांकडून तत्काळ पोलीस ठाण्याची पायरी गाठली जाते किंवा न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला जातो. मात्र, गुन्हा नोंदविण्यापूर्वी किंवा कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी समुपदेशनातून ही प्रकरणे सोडविण्यावर दिला जाणारा भर आणि जनजागृती या बाबींमुळे पोलीस आयुक्तालयातील महिला साह्यता कक्षाकडे गतवर्षीच्या तुलनेत यंदा तक्रार अर्जांचे प्रमाण वाढले आहे. मागील दहा महिन्यांत कक्षाकडे १,९२० अर्ज दाखल झाले असून, यामध्ये पुरुषांच्या अर्जांचे प्रमाण अधिक आहे. परंतु, प्रत्येक अर्जाच्या चौकशीसाठी लागणारा कालावधी आणि त्यानंतर समुपदेशनासाठी होणारी ३ ते ४ सेशन्स यांमुळे जून ते आॅक्टोबरदरम्यान जवळपास ५९७ अर्ज कक्षाकडे प्रलंबित असल्याची माहिती समोर आली आहे.गेल्या काही वर्षांत महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बहुतांश वेळा घरांमधील व्यक्तीकडूनच महिलांना शारीरिक आणि मानसिक छळांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्यासाठी कौटुंबिक हिंसाचाराचा कायदा अस्तित्वात आला आहे. या कायद्याअंतर्गत सासरच्या लोकांकडून सातत्याने होणाºया छळाविरोधात महिलांना थेट पोलीस ठाण्याची पायरी चढण्याची तरतूद असल्याने महिलांच्या तक्रारींचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसून येते. किरकोळ वादविवाद, मारहाण, विवाहबाह्य संबंध, विसंवाद तसेच एकमेकांकडून घटस्फोटाची मागणी अशा कारणांसाठी पोलीस ठाण्यांसह न्यायालयामध्ये अर्ज दाखल होत आहेत.मात्र, संसार मोडणे हा या कायद्याचा उद्देश नसल्याने पोलीस ठाणे आणि न्यायालयात अर्ज आल्यानंतर तातडीने संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविणे किंवा अर्जावर तत्काळ कारवाई केली जाण्याची प्रक्रिया केली जात नाही, तर सामोपचारातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातात. पोलीस ठाण्यांसह न्यायालयाकडे अर्ज आल्यानंतर ते अर्ज पोलीस आयुक्तालयाकडे पाठविले जातात. त्यानंतर ते अर्ज महिला साह्यता कक्षाकडे वर्ग केले जातात. हे अर्ज मिळाल्यानंतर तक्रारदार महिलेसह कुटुंबीयाचेदेखील एकत्रितपणे समुपदेशन केले जाते.कायद्याचा दुरूपयोग : पुरूषांकडून तक्रार अर्जकित्येक वेळा महिलांकडून छोट्या-छोट्या कारणांसाठी कौटुंबिक हिंसाचाराच्या कायद्याचा दुरुपयोग केला जात असल्याचे अनेकदा पाहायला मिळत असल्यामुळे पुरुषांकडूनही तक्रार अर्ज दाखल करण्याचे प्रमाण वाढत आहे. गेल्या वर्षी महिला साह्यता कक्षाकडे ३२८ पुरुषांचे अर्ज दाखल झाले होते. यंदाच्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत पुरुषांच्या अर्जाचे प्रमाण ४२३ इतके आहे. महिला साह्यता कक्षाकडे दाखल झालेल्या १,९२० अर्जांपैकी १,३२५ अर्जांची निर्गती झाली असली तरी जून ते नोव्हेंबरदरम्यानचे जवळपास ५९५ अर्ज चौकशीसाठी अद्यापही प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले आहे.महिला साह्यता केंद्राकडे आलेल्या अर्जांची रीतसर पडताळणी आणि चौकशी करून मगच संबंधितव्यक्तींना दूरध्वनी करून समुपदेशनासाठी वेळ दिली जाते. मात्र, या समुपदेशनासाठी प्रत्येकी चार ते पाच सेशन्स होत असल्याने अर्जाच्या निर्गतीला काहीसा विलंब लागत आहे.- कल्पना जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,महिला साह्यता कक्ष

टॅग्स :Puneपुणे