शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

संत नामदेव महाराजांचे स्मारक पंढरपूरला होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 04:59 IST

पंढरपूर येथे चंद्रभागेच्या तीरावर ६० कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक तंत्राचा वापर करून विश्वसंत नामदेव महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे.

पुणे : नामदेव समाजोन्नती परिषदेच्या पुढाकाराने व महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने पंढरपूर येथे चंद्रभागेच्या तीरावर ६० कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक तंत्राचा वापर करून विश्वसंत नामदेव महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाकडे आराखडा सादर करण्यात येणार असल्याचे नामदेव समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधीर पिसे यांनी सांगितले.या नियोजित स्मारकाचा आराखड्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असाव्यात, यावर चर्चा करण्यासाठी परिषदेने अभ्यासक, तज्ज्ञ आणि मार्गदर्शकांची बैठक नुकतीच पुण्यात झाली. याबद्दल अ‍ॅड. पिसे यांनी माहिती दिली.ते म्हणाले, ‘‘एकूण खर्चापैकी १५ कोटी शासनाने यापूर्वीच मंजूर केले आहेत. उर्वरित रक्कम केंद्र तसेच महाराष्ट्र, पंजाब, राजस्थान सरकारसह वारकरी, फडकरी तसेच सर्व जाती-धर्मातील बांधवांच्या सहकार्याने उभारण्यात येईल.’’ बैठकीला तु. पां. मिरजकर, डॉ. निशिकांत मिरजकर, डॉ. ज्ञानेश्वर तांदळे, प्राचार्य नि. ना. रेळेकर, वीणा मनचंदा, ह. भ. प. मंगला कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.तसेच ह. भ. प. वासुदेव उत्पात, ह. भ. प. प्रकाश निकते, ह. भ. प. चैतन्य महाराज देगलूरकर व प्रा. श्यामसुंदर मिरजकर यांचे विचार लिखित स्वरूपात सभेपुढे मांडण्यात आले.