शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

‘रागसरिता’ रसिकांच्या भेटीला, नव्या बंदिशींसह सादर होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 01:34 IST

ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि गुरू पं. चिंतामण रघुनाथ व्यास अर्थात सी. आर. व्यास यांनी बंदिशींच्या स्वरांकनाच्या स्वरूपात अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये मोलाचे योगदान दिले.

- प्रज्ञा केळकर-सिंगपुणे  - ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि गुरू पं. चिंतामण रघुनाथ व्यास अर्थात सी. आर. व्यास यांनी बंदिशींच्या स्वरांकनाच्या स्वरूपात अभिजात भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये मोलाचे योगदान दिले. त्यांनी रचलेल्या अनवट बंदिशी आणि स्वरचित रागांचे एकत्रीकरण ‘रागसरिता’च्या माध्यमातून करण्यात आले. ‘रागसरिता’मध्ये १२१ बंदिशी आणि रागांचा समावेश होता. आता, ६५ वर्षांनंतर नव्या ३२ बंदिशींसह हे पुस्तक रसिकांच्या भेटीला येत आहे.सी. आर. व्यास यांचे सांगीतिक कौशल्य आग्रा घराण्याचे पंडित जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या मार्गदर्शनाखाली बहरले. यास यांनी अनेक दशके जुन्या आणि नवीन रागांमध्ये बंदिशींची रचना केली. देशभरातील अनेक गायकांनी ह्या रचना गायलेल्या आहेत. बंदिशी अजरामर व्हाव्यात आणि नव्या पिढीकडे हा वारसा सुपूर्त व्हावा, यासाठी पुस्तकरूपात त्या शब्दबद्ध करण्यात आल्या. या पुस्तकाचे प्रकाशन १० नोव्हेंबर १९८४ रोजी पु. ल. देशपांडे आणि कुमार गंधर्व यांच्या हस्ते करण्यात आले होते. यानंतरही व्यास यांनी बंदिशी आणि रागांची रचना केली. त्यांच्या पश्चात हे सांगीतिक कार्याचे जतन व्हावे, यासाठी सी. आर. व्यास यांचे पुत्र सुहास व्यास यांनी पुढाकार घेतला आहे. नव्या स्वरुपातील ‘रागसरिता’साठी बंदिशींचे स्वरांकन पं. यशवंत महाले यांच्याकडून तपासून घेण्यात आले. सांगीतिक दृष्टिकोनातून त्याला शुद्ध स्वरुप देण्यात आले.सुरुवातीला विष्णू नारायण भातखंडे यांनी नोटेशन अर्थात स्वरांकनास सुरुवात केली. स्वरांकनासाठी भातखंडे लिपी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. सी.आर.व्यास यांनी बंदिशींच्या स्वरांकनामध्ये मोठे योगदान दिले आहे. याबाबत ‘लोकमत’शी बोलताना पं. सुहास व्यास म्हणाले, ‘प्रत्येक बंदिशीला संगीतामध्ये अनन्यसाधारण महत्व असते. पूर्वीच्या बंदिशींचा अभ्यास केल्याशिवाय नवीन रचना तयार करता येत नाहीत. त्यासाठी सूर, ताल, लय यांचा सूक्ष्म अभ्यास करावा लागतो. सी. आर. व्यास यांना त्यांच्या पिढीतील वाग्गेयकार म्हणून मानाचे स्थान होते. त्यांनी बंदिशींच्या स्वरांकनाच्या माध्यमातून आयुष्यातील काही घटना, कल्पना, गुरुंप्रती असलेली श्रद्धा असे वैविध्य आणण्याचे आव्हान पेलले. हा ठेवा पिढीकडे हस्तांतरित व्हायला हवा.’बंदिशींचे स्वरांकन पुढील पिढीसाठी कायम मार्गदर्शक ठरते. त्यामध्ये सूर, ताल, लय यांचा बारकाईने अभ्यास आणि मांडणी केलेली असते. सी. आर. व्यास यांना त्यांच्या पिढीत वाग्गेयकार म्हणून मानाचे स्थान मिळाले. त्यांच्या जास्तीत जास्त बंदिशी गायकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी ‘रागसरिता’ नव्या स्वरूपात रसिकांसमोर आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. - पं. सुहास व्याससी. आर. व्यास यांच्या बंदिशींमध्ये परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम साधलेला पाहायला मिळतो. बंदिशींचे अचूक सूत्र आत्मसात करत त्यांनी रचना केल्या. ‘रागसरिता’च्या माध्यमातून तरुण गायक, अभ्यासक, कलाकार, विद्यार्थ्यांना रागांचा प्रवाह, बंदिशींची रचना जाणून घेता येणार आहे. ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता एका विशेष समारंभात उस्ताद झाकीर हुसेन यांच्या हस्ते ‘रागसरिता’चे प्रकाशन होणार आहे.

टॅग्स :musicसंगीत