पुणे : श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या आगमनावेळी करावयाच्या कामांसदर्भात महापालिकेत आज नियोजन बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर चंचला कोद्रे यांनी खातेनिहाय आणि प्रभागनिहाय अधिकार्यांमार्फत कामांचा आढावा घेतला.या बैठकीत क्षेत्रीय कार्यालयांना तात्काळ उपाययोजना करण्याबाबत आदेश देण्यात आले. शहरातील उड्डाणपूल, रस्ते याठिकाणचा राडारोडा उचलणे, स्वागत कमानी रस्त्याशी समांतर ठेवणे, रस्त्याच्या कडेला असणारी अतिक्र मणे, पथारीवाल्यांच्या अनधिकृत गाड्या, केबल्स काढून टाकणे याबाबत निर्देश देण्यात आले. पालखी आमगनाच्या दिवशी परिसरातील मटण आणि दारूविक्र ी बंद करण्याबाबत चर्चा झाली. वारकर्यांच्या आरोग्यासाठी फिरता दवाखाना, रूग्णवाहिका उपलब्ध करणे, हाटेल्स, दुकाने येथील खाद्यपदार्थांची तपासणी , सर्व ठिकाणी शौचालयांची व्यवस्था, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणे. जुने आणि धोकादायक झाडे आणि फांद्या काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पालख्यांच्या आगमनाबाबत महापालिकेत बैठक
By admin | Updated: June 8, 2014 00:07 IST