शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेच्या प्रस्तावित शिवसृष्टीसाठी मंगळवारी मुंबईत बैठक; मुख्यमंत्र्यासमवेत चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 14:36 IST

महापालिकेच्या प्रस्तावित शिवसृष्टीबाबत निर्माण झालेला वाद सोडवण्यासाठी मुंबईत उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत दुपारी १ वाजता मंत्रालयात बैठक होत आहे.

ठळक मुद्देमाजी उपमहापौर, नगरसेवक दीपक मानकर यांनी शिवसृष्टीसाठी घेतला होता पुढाकारबीडीपीच्या जागेवर शिवसृष्टी होणार असेल तर मेट्रो त्या जागेपर्यंत नेण्याची 'महामेट्रो'ची तयारी

पुणे : महापालिकेच्या प्रस्तावित शिवसृष्टीबाबत निर्माण झालेला वाद सोडवण्यासाठी मुंबईत उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत दुपारी १ वाजता मंत्रालयात बैठक होत आहे. कोथरूड येथील जागा की त्यापुढे दोन किलोमीटर अंतरावर असलेली बीडीपीची (जैवविविधता उद्यान) जागा असा हा वाद आहे. त्यावर या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे.महापालिकेने शिवसृष्टीसाठी कोथरूड येथील एक भूखंड निश्चित केला होता. माजी उपमहापौर, नगरसेवक दीपक मानकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र त्यानंतर काही वर्षांनी मेट्रोच्या स्थानकासाठी म्हणून नेमकी हीच जागा निश्चित करण्यात आली. मेट्रोचे काम सुरूही झाले व शिवसृष्टीचा विषय मागे पडला. त्यात काहीच हालचाल होत नाही यामुळे मानकर यांनी शिवप्रेमी संघटनांच्या वतीने मेट्रोचे काम बंद पाडण्याचा इशारा दिला आहे. त्याच जागेवर मेट्रो स्थानकही व्हावे व शिवसृष्टीही व्हावी असा शिवप्रेमी संघटनांचा आग्रह आहे तर ती जागा संपूर्ण मेट्रो लाच द्यावी, शिवसृष्टी पुढे असलेल्या बीडीपी आरक्षीत जागेवर न्यावी, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.कोथरूड येथील जागा महापालिकेच्या मालकीची आहे. तिचे क्षेत्रफळ २८ एकर आहे. मेट्रो स्थानकासाठी इतकी जागा लागणार नाही, त्यामुळे शिवसृष्टीला १० एकर जागा द्यावी अशी मागणी आहे. बीडीपीची जागा सध्याच्या जागेपासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. तिचे क्षेत्रफळ ६५ एकर आहे. मात्र ती आरक्षीत असल्यामुळे व त्या जागेवर कसल्याही बांधकामाला मनाई आहे. शिवाय तिथे सुमारे २०० शेतकरी असून ते बाधीत झाल्यास त्यांची नुकसान भरपाई कोणी व कशी द्यायची असा प्रश्न आहे. मुखमंत्र्यासमवेत होणाऱ्या बैठकीत त्याचीच चर्चा होणार आहे. पालकमंत्री गिरीश बापट व महापौर मुक्ता टिळक यांनी या बैठकसाठी पुढाकार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही बोलावले जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, दीपक मानकर व सर्वपक्षीय गटनेत्यांनीही बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. दरम्यान बीडीपीच्या जागेवर शिवसृष्टी होणार असेल तर मेट्रो थेट त्या जागेपर्यंत नेण्याची महामेट्रो कंपनीची तयारी आहे. हे अंतर साधारण दोन किलोमीटर आहे. त्यात दोन स्थानके आहेत. तसा प्रस्तावही महामेट्रोने महापालिकेला दिला असल्याचे समजते. त्यावरही मंगळवारच्या बैठकीत चर्चा होईल. बहुसंख्य पदाधिकारी तसेच नगरसेवकांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका