शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाबाबत आज दिल्लीत बैठक, हवाई दलाकडून आक्षेप, संरक्षणमंत्री अध्यक्षस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 01:34 IST

पुणे : पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत हवाई दलाकडून उपस्थित करण्यात आलेल्या तांत्रिक आक्षेपांबाबत मंगळवारी (दि. २४) दिल्लीत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे.

पुणे : पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत हवाई दलाकडून उपस्थित करण्यात आलेल्या तांत्रिक आक्षेपांबाबत मंगळवारी (दि. २४) दिल्लीत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली आहे.पुरंदरला विमानतळ झाल्यास लोहगाव आणि नवीन विमानतळाचे सामायिक हवाई क्षेत्र (कॉमन फ्लाईंग एरिया) होईल, असा मुख्य आक्षेप हवाई दलाकडून घेण्यात आला आहे. यानंतर पुरंदर विमातळाची धावपट्टी लोहगाव विमानतळाच्या धावपट्टीला समांतर करण्याचे ठरले. मात्र, त्यानंतर पुरंदर विमानतळाच्या धावपट्टीमध्ये पंधरा अंशांपर्यंत कोनीय बदल (अ‍ॅन्ग्युलर चेंज) करण्याचे भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मान्य केले आहे. या सर्व बाबींवर आधारित महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून अहवाल तयार करण्यात आला असून तो संरक्षण विभागाला पाठविण्यात आला आहे. मंगळवारच्या बैठकीत या अहवालावर चर्चा होणार असून त्यामध्ये काही शंका असल्यास त्यांचे निरसन करण्यात येणार आहे.तांत्रिक समितीच्या लोकांबरोबर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधिकारी, हवाई दल, भारतीय विमानतळ प्राधिकरण यांचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. तांत्रिक अडचणींबाबत संरक्षण विभागाला अहवाल सादर केला आहे. त्या अहवालावर काही प्रश्न उपस्थित झाल्यास त्याबाबतचे स्पष्टीकरण बैठकीमध्ये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून देण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे आयुक्त सुरेश काकाणे यांनी दिली.तीन महिन्यांनंतर बैठकपुरंदर विमातळाबाबत संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत ७ जुलै २०१७ रोजी शेवटची बैठक झाली होती. त्यानंतर आता तीन महिन्यांनंतर बैठक पार पडणार आहे.