शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

शेळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळेना वैद्यकीय अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 00:31 IST

शेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी कोट्यवधीचा निधी खर्च करुन ती २०१६ मध्ये पूर्ण करण्यात आली. मात्र तीन वर्षांपासून या सुसज्ज इमारतीत वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी नाहीत.

निमसाखर : शेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी कोट्यवधीचा निधी खर्च करुन ती २०१६ मध्ये पूर्ण करण्यात आली. मात्र तीन वर्षांपासून या सुसज्ज इमारतीत वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी नाहीत. त्यामुळे ही कोट्यवधीची इमारत बांधल्यापासूनच धूळ खात पडून आहे. शेळगाव (ता. इंदापूर) येथील कोट्यावधीचा शासनाचा निधी खर्च करून सन २०१६ अखेर बांधकाम पूर्ण झालेले प्राथमिक आरोग्य केंद्रास जवळपास तीन वर्षे पूर्ण होऊनदेखील अद्यापही वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर व आरोग्य कर्मचारी मिळाले नाहीत. शेळगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या धूळ खात पडलेले आहे.

सन २०१२-२०१३ या बृहत आराखड्यानुसार दि. ११/०७/२०१४ रोजी इंदापूर तालुक्यातील शेळगावच्या नवीन आरोग्य केंद्रास प्रशासकीय मान्यता मिळून सदरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी उपलब्ध झालेल्या कोट्यावधीच्या निधीतून इंदापूर तालुक्यात सर्वात मोठे प्रशस्त व सुसज्ज असी प्राथमिक आरोग्य केंद्राची शेळगाव येथे उभारणी करण्यात आली. मात्र केवळ पद भरती नाही म्हणून मागील दोन वर्षांपासून हे प्राथमिक आरोग्य केंद्र बंद अवस्थेत आहे. परंतु शेळगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, आरोग्य सेवक,कर्मचारी सह एकूण १५ पद भरतीसाठीमहाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवार १६ फेब्रुवारी २०१८ रोजी मंजुरी दिली असून पद मंजुरी होऊन जवळपास एक वर्ष पूर्ण होत आली आहे. तरी देखील शेळगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अद्याप एकही वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर, कर्मचारी उपलब्ध झाले नाहीत.म्हणून तीन वषार्पासून शेळगावचे आरोग्य केंद्र धुळखात पडलेले आहे. यामुळे शेळगाव, कडबनवाडी, गोतोंडी,शिरसट्वाडी हगारेवाडी, व्याहाळीसह इतर भागातील नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. उपचारासाठी इतरत्र जावे लागत असल्यानें नागरिकांची महिलाची मोठी हेळसांड होताना दिसून येत आहे. म्हणून आरोग्य विभागाने शेळगावच्या आरोग्य केंद्रास डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांची लवकरात लवकर नेमणूक करून आरोग्य केंद्र सुरू करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.डिसेंबर २०१७ अखेर शेळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कोणत्याही परिस्थिती जिल्ह्णातील इतरत्र ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांना याठिकाणी नेमणूक करून शेळगावचे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती प्रविण माने यांनी एका वषार्पूर्वी दिली होती. मात्र जवळपास एक वर्षाचा कालावधी होऊन सुद्धा एकही वैद्यकीय अधिकारी,डॉक्टर याठिकाणी रुजू झालेली नाहीत. यामुळे आरोग्य सभापती व आरोग्य विभागाचा जिल्ह्णातील वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर व कर्मचारी यांच्यावर पकड नाही का असा सवाल शेळगावकरानी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Puneपुणे