शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय शाखांना हवे संशोधन केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 03:52 IST

डॉक्टर रुग्णांना संबंधित आजाराबाबत योग्य औषधोपचार करतात. ते एखाद्या आजाराच्या हजारो रुग्णांची तपासणी करतात. मात्र, या आजारामागील कारणमीमांसा, उपचारपद्धती, अद्ययावत बदल याबाबत बारकाईने संशोधन केले जात नाही.

पुणे : डॉक्टर रुग्णांना संबंधित आजाराबाबत योग्य औषधोपचार करतात. ते एखाद्या आजाराच्या हजारो रुग्णांची तपासणी करतात. मात्र, या आजारामागील कारणमीमांसा, उपचारपद्धती, अद्ययावत बदल याबाबत बारकाईने संशोधन केले जात नाही. वैद्यकीय क्षेत्रामध्ये संशोधनाला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे प्रत्येक महाविद्यालयामध्ये विविध वैद्यकीय शाखांसाठी स्वतंत्र संशोधन केंद्र उभारणे आवश्यक आहे, असे मत भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) महासंचालक डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी केले.बी. जे. मेडिकल वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालयातर्फे ‘रेस्पिरेअर’ या राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे ३ ते ५ आॅगस्ट दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटन समारंभात स्वामिनाथन बोलत होत्या. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते व मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मोहन आगाशे, अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, डॉ. समीर जोशी, डॉ. अजय तावरे, डॉ. अरुण कोवाळे, डॉ. मनजित संत्रे आदी उपस्थित होते.स्वामिनाथन म्हणाल्या, ‘कोणत्याही आजाराचे निदान हे फक्त औषध देऊन होत नाही, तर त्यावर संशोधन करणे फार महत्त्वाचे आहे. तरुण पिढीसाठी वाढते कुपोषण, लठ्ठपणा या गंभीर आजारावर निदान करण्याचे आव्हान आहे. आरोग्य समस्यांवरील परिणामकारक आणि स्वस्त उपायांसाठी देशांतर्गत संशोधन आणि क्लिनिकल ट्रायल घेणे आवश्यक आहे.आगाशे म्हणाले, ‘पुस्तक फक्त अभ्यासासाठी वापरले जाते. त्याचा उपयोग ज्ञानासाठी केला जात नाही. मुलांनी वाचनातून ज्ञान संपादन करावे.’