शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांची मध्यस्थीची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 07:14 IST

शिवराळ शब्दांच्या वापरावरून गाजत असलेल्या महापालिकेतील काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे व भाजपाचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या प्रकरणात महापौर मुक्ता टिळक यांनी

पुणे : शिवराळ शब्दांच्या वापरावरून गाजत असलेल्या महापालिकेतील काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे व भाजपाचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या प्रकरणात महापौर मुक्ता टिळक यांनी मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली. या प्रकरणासंबंधाने निवेदन घेऊन आलेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाला त्यांनी तसे सांगितले. त्यानंतर लगेचच भाजपा युवा मोर्चाच्या वतीनेही महापौरांना निवेदन देऊन शिंदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी महापौर टिळक यांची भेट घेण्यात आली. विद्येचे माहेरघर व सांस्कृतिक राजधानी असा मान असलेल्या पुणे शहरात महापालिकेत असा प्रकार घडणे दुर्दैवी आहे. सध्या महापालिकेत मुख्य इमारत, तसेच अन्य अधिकाऱ्यांची कार्यालये यांमध्ये झुंड करून उभे राहणे, त्यांना धमकावणे असे प्रकार होत आहेत. महापालिका सभागृहात तसेच सभागृहाच्या बाहेरही सर्व पक्ष विकासाच्या प्रश्नावर, योजनांवर एकमताने निर्णय घेतात, याची अनेक उदाहरणे आहेत. शिंदे हे काँग्रेसचे गटनेते असून अभ्यासू व स्वच्छ प्रतिमेचे नगरसेवक आहेत. त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप करणे काँग्रेस पक्ष यापुढे खपवून घेणार नाही, असा इशारा या वेळी बागवे यांनी दिला.त्यांच्यासमवेत प्रदेश समितीचे सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, स्वत: नगरसेवक अरविंद शिंदे, नगरसेवक वैशाली मराठे, लता राजगुरू, शहर सरचिटणीस रमेश अय्यर, संगीता तिवारी, महिला अध्यक्ष सोनाली मारणे व अन्य पदाधिकारी होते. महापौरांनी यात लक्ष घालावे, योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी बागवे यांनी केली.भाजपा युवा मोर्चाचे पुणे शहराध्यक्ष नगरसेवक दीपक पोटे यांच्या नेतृत्वाखाली सुनील मिश्रा, किरण ओरसे, शशांक सुर्वे, जयदीप पारखी, नगरसेवक सुशील मेंगडे, प्रतीक देसर्डा आदींनी महापौरांना निवेदन दिले.आता दावा १०० कोटींचापुणे : महापालिकेचे सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांना, मंगळवारी १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याबाबत वकिलामार्फत नोटीस बजावली. ४८ तासांच्या आत माफी मागितली नाही, तर खटला दाखल करण्याचा इशारा भिमाले यांनी दिला आहे.महापालिका सर्वसाधारण सभेत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या एका विषयावरून भिमाले व त्यांच्यात जोरदार वादावादी झाली होती. भिमाले यांनी वापरलेल्या अपशब्दांचा आधार घेत शिंदे यांनी याआधीच पोलिसांकडे फिर्याद दिली असून, त्याशिवाय २५ कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावाही दाखल केला आहे. प्रत्युत्तरादाखल भिमाले यांनीही त्यांना या संदर्भात वकिलाच्या माध्यमातून नोटीस बजावली आहे.शिंदे यांनी भिमाले यांना सभागृहात जाहीरपणे अयोग्य शब्द वापरले. फेसबुकवरही अशिष्ट शब्दांत उल्लेख केला. सन २०१४मध्ये काँग्रेसची महापालिकेतील सत्ता गेली; त्यामुळे शिंदे भाजपाचा द्वेष करीत असतात. नैराश्यातून तेभाजपा व पदाधिकारी यांच्या सातत्याने बदनामी करण्याचाप्रयत्न करीत आहेत.