शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीत यश मिळवून देऊ शकणाराच महापौर

By admin | Updated: February 3, 2016 01:46 IST

महापालिकेच्या आगामी फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये यश मिळवून देऊ शकेल अशा नगरसेवकाची महापौरपदी वर्णी लागणार आहे

पुणे : महापालिकेच्या आगामी फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये यश मिळवून देऊ शकेल अशा नगरसेवकाची महापौरपदी वर्णी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने मिळविलेल्या घवघवीत यशाच्या पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीमध्ये सक्षम नेतृत्व देऊ शकेल अशा माननीयांच्या गळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापौरपदाची माळ घातली जाणार आहे.महापौरपदाचा कार्यकाळ अडीच वर्षाचा असला तरी एका टर्ममध्ये सव्वा-सव्वा वर्षाच्या कालावधीसाठी दोघांना महापौरपदाची संधी दिली जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी महापालिकेमध्ये सत्तेवर आल्यानंतरच स्पष्ट केले होते. त्यानुसार पहिल्या टर्ममध्ये वैशाली बनकर व चंचला कोद्रे यांना संधी देण्यात आली. दत्तात्रय धनकवडे यांचाही सव्वा वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर इच्छुकांनी महापौर पदासाठी प्रयत्न केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम पार पडल्यानंतर (२० डिसेंबर २०१५) महापौर दत्तात्रय धनकवडे यांचा राजीनामा घेतला जाईल अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यामुळे महापौर पदासाठी इच्छुक असलेल्या नगरसेवकांनी त्यापूर्वीपासून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली होती. मात्र, धनकवडे यांचा राजीनामा लांबल्याने इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. मंगळवारी अखेर धनकवडे यांना राजीनामा सादर झाल्यानंतर इच्छुकांच्या हालचालींना पुन्हा वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नगरसेवक विकास दांगट, दीपक मानकर, प्रशांत जगताप, बाबूराव चांदेरे, दिलीप बराटे, चेतन तुपे, सुभाष जगताप, बाळासाहेब बोडके महापौर पदासाठी इच्छुक आहेत.