शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांनीच केले कमला नेहरू रुग्णालयात स्टिंग आॅपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 00:31 IST

प्रत्यक्षात तीन भूलतज्ज्ञांची नेमणूक असताना ‘आता भूलतज्ज्ञ नाही, तुम्ही ससून रुग्णालयात जा,’ असे रुग्णांना महापौरांसमोर सांगण्याचा प्रकार कमला नेहरू रुग्णालयात घडला.

पुणे : प्रत्यक्षात तीन भूलतज्ज्ञांची नेमणूक असताना ‘आता भूलतज्ज्ञ नाही, तुम्ही ससून रुग्णालयात जा,’ असे रुग्णांना महापौरांसमोर सांगण्याचा प्रकार कमला नेहरू रुग्णालयात घडला. महापौर मुक्ता टिळक यांनी बुधवारी सायंकाळी अचानक पाहणी करून रुग्णालयात ‘स्टिंग आॅपरेशन’च केले. या वेळी डॉक्टरांची गैरवर्तणूक उघडकीस आली.प्रसूतीसाठी आलेल्या एका महिलेला भूलतज्ज्ञ नसल्याने दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला महापौरांसमोर देण्यात आला. महापौरांनी संबंधित डॉक्टरांना फैलावर घेत व्यवस्था सुधारण्याची तंबी दिली. विशेष म्हणजे या रुग्णालयात तीन भूलतज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यापैकी एकही डॉक्टर रात्री रुग्णालयात येत नाही. काहीही कारणे त्यासाठी दिली जातात. महापालिकेच्या सेवेत असूनही प्रत्यक्ष सेवा देणे टाळले जाते. महापौरांकडे याबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी बुधवारी सायंकाळी कोणालाही कसलीही कल्पना न देता अचानक कमला नेहरू रुग्णालयाला भेट दिली.त्या वेळी या महिलेच्या नातेवाईकांना उपस्थित डॉक्टरांनी आमच्याकडे आता भूलतज्ज्ञ नाही, तुम्ही ससून रुग्णालयात जा, असा सल्ला दिला. महापौर मुक्ता टिळक यांच्यासमोरच हा प्रकार घडला. त्या महिलेच्या नातेवाईकांनी आम्हाला ससूनला जायचे नाही, येथेच काहीतरी करा, अशी विनंती केली.संतापलेल्या महापौर टिळक यांनी या वेळी उपस्थित डॉक्टरांना फैलावर घेतले. प्रभारी आरोग्यप्रमुख डॉ. अंजली साबणे यांना दूरध्वनी करून त्यांना भूलतज्ज्ञ डॉक्टरांची त्वरित व्यवस्था करण्याचे आदेश दिले.त्यानंतर महापौरांनी संपूर्ण रुग्णालयाची पाहणी केली. तिथे त्यांना अनेक त्रुटी आढळल्या. रात्रीच्या वेळी तीन प्रशिक्षणार्थी डॉक्टर उपस्थित असण्याची गरज असताना तिथे एकही डॉक्टर नव्हता. उपस्थित डॉक्टर रुग्णांची पाहणी वगैरे करत नव्हते. एका खासगी संस्थेच्या वीतने सुरू करण्यात आलेला कार्डियोलॉजी विभाग व्यवस्थित आहे, मात्र महापालिकेचे विभाग व्यवस्थित नाहीत, असे त्यांना आढळले.>कोट्यवधीची तरतूद, तरीही दुरवस्था कशी?अंदाजपत्रकात वैद्यकीय विभागासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तरीही या ठिकाणी दुरवस्था का असते, याचा शोध प्रशासनाने घ्यावा, गरीब नागरिकांसाठी आरोग्यसेवा अशी असेल, तर त्यांनी जायचे कुठे, असा सवाल महापौरांनी केली. आयुक्तांकडे याबाबत सविस्तर तक्रार करणार असल्याचे व त्याचा सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.