शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

वादळी पावसाने घेतला मायलेकीचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 17:48 IST

घराची भिंत अंगावर पडल्याने दुपारी साडे चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

ठळक मुद्देक्षीरसागर कुटुंब मुळचे बीड जिल्ह्यातील असून पुण्यात मांजरी येथील गोपाळपट्टी येथे एका घरात भाड्याने रहात होते. शुक्रवारी दुपारी वादळी वार्‍यासह  आलेल्या पावसामुळे त्यांच्या राहत्या घरातील भिंत पडली.गंभीर जखमी झाल्याने शितल व दिव्या यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रणव गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

पुणे : पुण्यात शुक्रवारी झालेल्या वादळी पावसाने आई आणि मुलीचा बळी घेतला आहे. तर तीन वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. घराची भिंत अंगावर पडल्याने दुपारी साडे चारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.शितल शेषनारायण क्षीरसागर (वय ३१), दिव्या शेषनारायण क्षीरसागर (वय ५) अशी मृतांची नावे आहेत. तर प्रणव शेषनारायण क्षीरसागर (वय ३) हा मुलगा जखमी झाला आहे. क्षीरसागर कुटुंब मुळचे बीड जिल्ह्यातील असून पुण्यात मांजरी येथील गोपाळपट्टी येथे एका घरात भाड्याने रहात होते. शितल यांचे पती शेषनारायण हे टेम्पो चालक आहेत. तर शितल घरीच असायच्या. शुक्रवारी दुपारी वादळी वार्‍यासह  आलेल्या पावसामुळे त्यांच्या राहत्या घरातील भिंत पडली. घरात काम करीत असलेल्या शितल यांच्यासह दिव्या व प्रणव यांच्या अंगावर ही भिंत पडली. गंभीर जखमी झाल्याने शितल व दिव्या यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रणव गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. दुर्घटना घडली तेव्हा शेषनारायण कामावर गेलेले होते. 

घटनास्थळी तत्काळ सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे, पोलीस नाईक प्रकाश देसाई, ग्रामविकास अधिकारी अनिल कुंभार यांनी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमचंद्र खोपडे हे करत आहे.