शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

माऊलींच्या रथाला यंदा नवा साज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 02:48 IST

लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा यंदा नव्या रथातून पंढरीकडे प्रस्थान करणार आहे.

पुणे  - लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेला संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा यंदा नव्या रथातून पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. रथाला नवा साज चढविला असल्यामुळे दिमाखात पालखी सोहळा यंदा निघणार आहे. या रथासाठी वडगाव-मावळ येथील जाधव कुटुंबाने देणगी दिली आहे. रमेशभाई मिस्त्री यांच्या कारागिरीखाली हा नवा रथ तयार करण्यात येत आहे.माउलींच्या पालखी सोहळ्याचा रथ खूप जुना झाला होता. या रथाची सातत्याने दुरुस्ती आणि डागडुजी करावी लागत होती. त्यामुळे नवा रथ घडविण्यात येणार होता. पण वडगाव-मावळ येथील माउलींचे भक्त जाधव कुटुंबीय पुढे आले आणि त्यांनी पालखी सोहळ्याच्या रथासाठी देणगी दिली. त्यामुळे माउलींचा पालखी सोहळा नव्या रथातून प्रस्थान ठेवणार आहे, अशी माहिती पालखी सोहळ्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली. माऊलींची पालखी घडविणाºया मिस्त्री कुटुंबाची चौथी पिढी या सेवेत आहे. देवस्थानांसाठी मूर्ती, रथ, सजावटीचे काम हे कुटुंब करते. माउलींच्या पालखी सोहळ्याचा नवा रथा घडविण्याचे काम रमेश, राजू आणि प्रकाशभाई मिस्त्री असे आम्ही तीन भाऊ आणि आमचे नऊ कारागीर मिळून गेल्या चार महिन्यांपासून करत आहेत. नवा रथ पूर्वीच्या रथाच्या तुलनेत वजनाने थोडा हलका आहे, तरी अधिक मजबूत, सुबकही आहे. आधीच्या रथाचे खांब पातळ होते, नव्या रथाचे खांब भरीव, मजबूत आहेत, असे रथ घडविणारे रमेशभाई मिस्त्री यांनी सांगितले. रथ घडविण्यासाठी जर्मन सिल्व्हरचा वापर करण्यात आला आहे. रथाच्या निर्मितीसाठी १३० किलो जर्मन सिल्व्हर तसेच १२० घनफूट सागवान लाकूड वापरण्यात आहे. रथाच्या निर्मितीसाठी सुमारे २० लाख रुपये खर्च आला, असेही मिस्त्री यांनी सांगितले.-नव्या रथाचे वजन सुमारे दीड टन- रथावर नक्षीदार कामाने सजलेल्या दहा महिरपी-रथाला तोलण्यासाठी आठ मजबूत स्तंभ- रथावर उभारलेले चार गज आणि तीन घुमट-गरुड आणि हनुमंताच्या मूर्तीची प्रतिकृती- रथाचे सौंदर्य खुलविणारे अकरा कळस

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या