शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लेकरांविना माऊली आजोळघरी मुक्कामी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 02:07 IST

संत ज्ञानेश्वरांच्या आषाढीवारीचे प्रस्थान; दरवर्षीपेक्षा आगळावेगळा सोहळा

- भानुदास पºहाड शेलपिंपळगाव (जि. पुणे): श्रीसंतश्रेष्ठ ज्ञानेश्वरमहाराजांच्या १८९ व्या आषाढीवारी प्रस्थान सोहळ्यास शनिवारी पहाटे चारला घंटानादाने सुरुवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तीच्या या छोटेखानी सोहळ्यात ना टाळाचा प्रचंड गजर झाला, ना पखवादाची थाप, ना फेर-फुगड्या, ना देहभान विसरून नाचणारे वारकरी. शासनाच्या नियमांचे पालन करत मोजक्याच वारकऱ्यांच्या समवेत सायंकाळी ४.३० वाजता माऊलींच्या चांदीच्या चलपादुकांनी मुख्य मंदिरातून प्रस्थान ठेवले.दरवर्षी लाखो लेकरांसह निघणारा पायी पालखी सोहळा कोरोनामुळे रद्द झाला आहे. परंतु परंपरेप्रमाणे प्रस्थान सोहळा पार पडला. सुरुवातीला प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील यांच्या हस्ते माऊलींच्या संजीवन समाधीवर पवमान अभिषेक, दुधारती आणि महापूजा करण्यात आली. वीणामंडपात सकाळी दहानंतर वैष्णवमहाराज चोपदार यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर माऊलींना नैवेद्य दाखविण्यात आला. त्यानंतर सायंकाळी प्रस्थानाच्या मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली.ब्रह्मवृंदाच्या हस्ते माऊलींच्या संजीवन समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पोशाख करण्यात आला. दरम्यान, शासनाने परवानगी दिलेल्या प्रस्थान संबंधित मानकरी, दिंडीकरी, सेवेकरी आदींना पानदरवाज्यातून मंदिरात प्रवेश देण्यात आला. त्यानंतर मालकांनी शितोळे सरकारांना सन्मानपूर्वक मंदिरात आणले. माऊलींची आणि गुरू हैबतबाबांची आरती घेऊन देवस्थानच्या विश्वस्तांकडून माऊलींच्या चांदीच्या चलपादुका परंपरेनुसार पालखी सोहळामालक बाळासाहेब आरफळकर यांच्या हातात सुपूर्द करून, चलपादुकांचे मंदिरातून प्रस्थान ठेवण्यात आले.वीणामंडपातून चलपादुका बाहेर आणल्यानंतर, मंदिर आवारात मोजक्याच वारकऱ्यांच्या ‘ज्ञानोबा - माऊली - तुकारामांच्या’ जयघोषात प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यानंतर देऊळवाड्याच्या दरवाजाने परंपरेप्रमाणे पादुका लगतच्याच आजोळघरात (दर्शनमंडप) विराजमान करण्यात आल्या. त्याठिकाणी समाजआरती घेऊन पहिल्या दिवसाचा जागर करण्यात आला.