शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

साहित्यातून माणूसपणाचा ठाव

By admin | Updated: March 26, 2015 00:27 IST

खोडकर मुलगा, प्रेमळ वडील असे वपुंच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू उलगडत त्यांच्यातल्या माणूसपणाचा ठाव घेणारी साहित्य सफर पुणेकरांनी बुधवारी अनुभवली.

पुणे : एक आर्किटेक्ट, सिद्धहस्त लेखक, चोखंदळ श्रोता, कसबी कथाकथनकार, खोडकर मुलगा, प्रेमळ वडील असे वपुंच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू उलगडत त्यांच्यातल्या माणूसपणाचा ठाव घेणारी साहित्य सफर पुणेकरांनी बुधवारी अनुभवली.निमित्त होते व. पु. काळे यांच्या ८३व्या जयंतीनिमित्त धुळ्यातील वि. का. राजवाडे संशोधन मंडळातर्फे ‘व. पु. एक अमृतानुभव’ या कार्यक्रमाचे. अभिनेते प्रदीप वेलणकर, लेखिका डॉ. वीणा देव, कथाकथनकार रेखा मुंदडा, मेहता पब्लिकेशन्सचे अनिल मेहता, शिरीष रायरीकर उपस्थित होते.वपु यांच्या कन्या स्वाती चांदोरकर म्हणाल्या, ‘‘आमच्याकडे एक प्लेझर बॉक्स असे. त्यामध्ये वाचकांची काही पत्रे लिखाणाचे कौतुक करणारी तर काही टीकात्मक. अशा पत्रांवर बापू व. पु. काळे म्हणत ‘हे माझ्यासाठी एक आव्हान आहे.’ लिखाणात तोचतोचपणा येतोय, त्यामुळे लिखाण बंद करा, अशा वाचकांच्या पत्रावर बापू म्हणत, वाचकांच्या नाडीची ओळख असल्यामुळे जगण्याचा आनंद हा शब्दांतूनच शोधता येतो. या पत्रव्यवहारमुळे बालपण समृद्धी, शब्दसंपत्तीमध्ये गेले. कुटुंबामध्ये कोणी कथाकथनकार न झाल्याची खंतही ते नेहमी व्यक्त करीत, अशी आठवण चांदोरकर यांनी रसिकांसमोर मांडली.व. पु. काळे यांच्या काही चित्रफितीही दाखविण्यात आल्या. (प्रतिनिधी)कादंबरीमध्ये जिवंतपणा संवादामुळे येतो, हेच कौशल्य त्यांच्याकडे होते. याचे वैशिष्ट्य म्हणजे चांगली कथा पुस्तकामध्ये संपल्यानंतर ती वाचकांच्या मनात सुरू होते. ते अत्यंत प्रेमळ, उत्साही, माणसांचे सेतू जोडणारे होते.- डॉ. वीणा देव