शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कॉसमॉस बँक सायबर हल्ल्यातील मुख्य सूत्रधार ३ वर्षांनंतरही मोकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 07:57 IST

भारतातील मास्टरमाईंड जाळ्यात; आंतरराष्ट्रीय हॅकर अजूनही गुलदस्त्यात

- विवेक भुसेपुणे : कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर भारतातील सर्वांत मोठा सायबर हल्ला करून तब्बल ९४ कोटी ४२ लाख रुपये लुटणाऱ्या आंतरराष्ट्रीय हॅकरपर्यंत पोहोचण्यात अजूनही यश आलेले नाही. २८ देशांतील सरकारचे सहकार्य न मिळाल्याने तीन वर्षांनंतरही हे सायबर चोरटे मोकाट आहेत. त्याच वेळी भारतातील रुपे कार्डवरून अडीच कोटी रुपये काढण्यात मुख्य सहभाग असलेल्या सुमेर शेखला संयुक्त अरब अमिरात (यूएई) पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर ११ ऑगस्ट २०१८ रोजी हल्ला करून जगभरातील २८ देशांमधून ७८ कोटी रुपये काढले गेले. केवळ २ तास १२ मिनिटांत जगभरातील विविध एटीएम सेंटरमधून १२ हजारांहून अधिक व्यवहार करून हे पैसे काढले गेले होते. देशातील हा सर्वांत मोठा सायबर हल्ला होता. तपासासाठी पुणे पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली होती. सायबर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे व त्यांच्या पथकाने तपास करताना सर्वाधिक व्यवहार झालेल्या कोल्हापूर शहरावर लक्ष केंद्रित करून प्रत्यक्ष एटीएम सेंटरमध्ये जाऊन पैसे काढणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक केली. साखळीतील हे सर्वांत शेवटचे घटक होते. काही पैशांच्या मोबदल्यात त्यांनी पैसे काढून देण्याचे काम केले होते.पुणे पोलिसांनी या प्रकरणात १८ जणांना अटक केली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असून एकाला जामीन मिळाला आहे. अन्य १६ जण अजूनही येरवडा कारागृहात आहेत. पोलिसांनी जवळपास साडेपाच लाख रुपयांचे १७ मोबाईल, हार्ड डिस्क व अन्य साहित्य जप्त केले आहे.पाच म्होरके असल्याचे निष्पन्नभारतात रुपे कार्डमार्फत झालेल्या सायबर चोरीचा तपास पोलिसांनी जवळपास पूर्ण केला आहे. त्यात दुबईस्थित सुमेर शेख हा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने ज्यांच्यामार्फत हा सर्व प्रकार घडवून आणला, ते ५ प्रमुख म्होरके पोलीस तपासात निष्पन्न झाले असून त्यातील दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. तिघे जण फरार आहेत.