शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मशेरी सुदृढ बाळासाठी घातक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 01:52 IST

मशेरी तसेच तंबाखूचा वापर करणाऱ्या महिलांमध्ये अ‍ॅनिमियाचे प्रमाण अन्य महिलांच्या तुलनेत चार पटीने जास्त असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे.

पुणे : मशेरी तसेच तंबाखूचा वापर करणाऱ्या महिलांमध्ये अ‍ॅनिमियाचे प्रमाण अन्य महिलांच्या तुलनेत चार पटीने जास्त असल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. तंबाखूचा वापर करणाºया महिलांच्या नवजात शिशूंचे वजनही तुलनात्मकदृष्ट्या कमी असल्याचे अभ्यासात निष्पन्न झाले आहे. त्यामध्ये अल्प उत्पन्न गटातील महिलांचे प्रमाण अधिक आहे.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मानवशास्त्र विभागाअंतर्गत डॉ. हेमलता शेडगे यांनी हे संशोधन केले आहे. त्या सध्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील सीटीयू विभागात कार्यक्रम व्यवस्थापक या पदावर कार्यरत आहेत.‘तंबाखूच्या वापराने गर्भवती महिलांवर होणार परिणाम’ या विषयावर त्यांनी मागील महिन्यात शोधप्रबंध सादर केला आहे. त्यासाठी त्यांनी २०१४-१५ या वर्षात अभ्यास केला. मशेरी हा प्रकार महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांकडून मशेरीचा वापर जास्त केला जातो, असे जागतिक तंबाखू सर्वेक्षणामध्ये नोंदविण्यात आले आहे.या पार्श्वभूमीवर मानवशास्त्र विभागामधील प्रा. शौनक कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या अभ्यासात शेडगे यांनी तंबाखूचावापर न करणाºया महिलांच्यातुलनेत तंबाखूचा वापर करणाºया महिलांचे वजन कमी असल्याचे दाखवून दिले आहे. तसेचउच्चशिक्षित महिलांच्या तुलनेमध्ये अशिक्षित महिलांना अ‍ॅनिमिया होण्याची शक्यता ९ पटीने अधिक आढळली.>शिशूंचे वजन तुलनात्मकदृष्ट्या कमीअभ्यासासाठी पुण्यामधील दोन सरकारी व दोन खासगी रुग्णालयांमधील ५९१ महिलांची निवड करण्यात आली होती. या महिलांपैकी १४० म्हणजेच २३.६९ टक्के महिलांच्या नवजात शिशूंचे वजन कमी आढळले. या अभ्यासामध्ये तंबाखूचा वापर करणाºया महिलांच्या नवजात शिशूंचे वजनही तुलनात्मकदृष्ट्या कमी आढळले.अशा महिलांच्या भुकेवर, त्यांच्या गरोदरपणातील वजनवाढीवर तंबाखूचा परिणाम होत असावा, अशी ठळक शक्यता या अभ्यासांती व्यक्त करण्यात आली आहे. तंबाखू हा एक विषजन्य घटक आहे.जगभरात मृत्यूस कारणीभूत असणाºया दहा मुख्य आजारांपैकी आठ आजारांमागे तंबाखूचे सेवन हे एक मुख्य कारण असू शकते, असे सर्वेक्षणामधून स्पष्ट झाले आहे. शहरातील चार रुग्णालयांमधील ५९१ महिलांपैकी १९१ महिला मशेरीच्या आहारी केल्याचे आढळून आले. या महिला अल्प उत्पन्न गटातील असून घरकाम करणाºया किंवा गृहिणी आहेत. मशेरी किंवा तंबाखूमुळे भुकेवर परिणाम होऊन जेवण कमी जाते. त्यामुळे गर्भवती असताना आवश्यक पोषक आहार मिळत नाही. परिणामी अ‍ॅनिमियाचे प्रमाण वाढते. या महिलांना डॉक्टरांनी कधीही त्यांच्या सवयीबद्दल विचारले नाही. त्यामुळे त्यांची ही सवय कमी झाली नसल्याचे दिसून आले.- डॉ. हेमलता शेडगे, संशोधक