शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगड इन्स्टिट्युटचे अध्यक्ष मारुती नवले यांना अटक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 23:18 IST

प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी शिक्षा झालेल्या सिंहगड इन्स्टिट्युटचे अध्यक्ष मारुती नवले यांना पुणे पोलिसांनी अटक करुन त्याची सायंकाळी येरवडा तुरुंगात रवानगी केली.

पुणे - प्राध्यापकांचे वेतन देण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी शिक्षा झालेल्या सिंहगड इन्स्टिट्युटचे अध्यक्ष मारुती नवले यांना पुणे पोलिसांनी अटक करुन त्याची सायंकाळी येरवडा तुरुंगात रवानगी केली. नवले व प्राप्तीकर खात्यातील अधिकारी सदाशिव मोकाशी यांना न्यायालयाने ७ दिवसांची साधी कैद आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा गेल्या आठवड्यात सुनावली होती. न्यायालयाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.पुणे पोलिसांनी बुधवारी सायंकाळी नवले यांना अटक करुन त्यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर त्यांची येरवडा कारागृहात रवानगी केली.सिंहगड इन्स्टिट्यूटच्या प्राध्यापकांचे वेतन अनेक महिने थकवल्याप्रकरणी पुण्यात अनेक आंदोलने झाली होती. या आंदोलनानंतरही संस्थेने त्याची दखल घेतली नव्हती. अखेर प्राध्यापकांनी न्यायालयात धाव घेतली होती. प्राध्यापकांचे जवळपास १८ कोटी रुपयांचे थकलेले वेतन तीन टप्प्यांत देण्यात यावे, असे न्यायालयाने आदेश दिले होते. समाजकल्याण विभागाकडून येणे असलेले साधारण ९ कोटी रुपये संस्थेच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात जमा झाले. नवले यांची खाती प्राप्तिकर खात्याने गोठवली होती. ९ कोटी रुपये काढण्यासाठी न्यायालयाने तोंडी आदेश दिले आहेत, अशा आशयाचे पत्र नवले यांनी बँक आणि प्राप्तिकर खात्याला दिले. त्यानुसार प्राप्तिकर खात्याने पैसे काढण्यास परवानगी दिली. हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने नवले आणि प्राप्तिकर खात्यातील अधिकारी सदाशिव मोकाशी यांच्या विरोधात न्यायालयाचा अवमान प्रकरणी कारवाई केली होती. नवले यांच्या विरोधात दाखल झालेल्या अवमान याचिकेवर निकाल देताना उच्च न्यायालयाने नवले यांच्यासह मोकाशी यांना ७ दिवसांची साधी कैद आणि २ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. या आदेशाची आज अंमलबजावणी करीत पोलिसांनी त्यांची रवानगी येरवडा तुरुंगात केली.

टॅग्स :Courtन्यायालय