शिक्रापूर : येथे एका खासगी हॉस्पिटलमध्ये नोकरी करणाऱ्या युवतीचा येथीलच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या युवकाने लग्नाच्या आमिषाने विनयभंग केला असून युवतीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.पीडित युवती ही शिक्रापूर येथील एका हॉस्पिटलमध्ये नोकरी करते तर सूरज जाधव हा युवक दुसऱ्या एका हॉस्पिटलमध्ये कामाला आहे. पीडित युवती व सूरज यांची ओळख झाली. यानंतर सूरज याने या युवतीस हॉस्पिटलमध्ये बोलावून तिच्या मानत लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले व लग्नाचे आश्वासन देत राहिला.याबाबत पीडित युवतीने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. पोलिसांनी सूरज जाधव (रा. डफळवस्ती, धामारी, ता. शिरूर जि. पुणे) याच्याविरुद्ध विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल केला असून शिक्रापूर पोलिसांनी आरोपी सूरज जाधव यास अटक केली आहे.
लग्नाच्या आमिषाने महिलेचा विनयभंग
By admin | Updated: March 26, 2017 01:35 IST