वडगाव निंबाळकर : माहेरहून ५० हजार रुपये आणावेत या मागणीसाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी करंजेपुल (ता.बारामती) येथील तीन जणांविरोधात वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सारीका लालासो गायकवाड (रा. गायकवाडमळा , करंजेपुल ) या विवाहीतेने वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी तिचा पती लालासो गणपत गायकवाड , सासरे गणपत दगडु गायकवाड, दिर संतोष गणपत गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विवाहानंतर २ महिन्यांनंतर आरोपींनी सारिकाला ‘तुझ्या आई वडिलांनी हुंडा दिला नाही .तिने माहेरहुन ५० हजार रूपये घेऊन येण्यासाठी मारहाण शिवीगाळ, दमदाटी करण्यात आली.
५० हजारांच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ
By admin | Updated: June 13, 2015 22:46 IST