शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
3
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
4
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
5
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
6
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
7
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
8
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
9
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
10
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
11
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
12
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
13
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
14
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
15
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
16
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
17
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
18
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
19
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
20
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे

झेंडू फेकला रस्त्यावर

By admin | Updated: October 30, 2016 02:47 IST

दरवर्षी दसरा आणि दिवाळी सणाला नगदी उत्पन्न देणाऱ्या झेंडूने (गोंडा) यंदा मात्र शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. बाजारभाव न मिळाल्याने उत्पादकांनी झेंडू अक्षरश: फेकून दिला.

जेजुरी : दरवर्षी दसरा आणि दिवाळी सणाला नगदी उत्पन्न देणाऱ्या झेंडूने (गोंडा) यंदा मात्र शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. बाजारभाव न मिळाल्याने उत्पादकांनी झेंडू अक्षरश: फेकून दिला. तसेच फटाकाविक्री करणाऱ्यांनाही त्याचा फटका बसला आहे. दसरा आणि दिवाळी सणाला हमखास नगदी उत्पन्न देणारे पीक म्हणजे झेंडू. या भागात झेंडूला गोंडा म्हणूनच संबोधले जाते. जिरायती जमीन आणि कमी पावसावर येणारे हे पीक सणासुदीला मोठे नगदी उत्पन्न देत असल्याने पुरंदर तालुक्यात झेंडूची मोठी लागवड होते. यंदा तर पावसाने जेजुरी परिसराला हुलकावणीच दिली असली, तरी ही जेजुरी, कोथळे, रानमळा, धालेवाडी, दौंडज, पिंगोरी आदी भागात झेंडूची मोठी लागवड झाली होती. बाजारात गावरान व कलकत्ता जातीच्या झेंडूला ३ ते ५ रुपये, गोल्डन जातीचा ५ ते ७ रुपये, येरो गोल्ड जातीच्या झेंडूला ८ ते १० रुपये किलोचा बाजारभाव मिळाल्याने शेतकरी निराश झाले होते. यातच झेंडू फुलाच्या पोत्याचे वजन करण्यासाठी १० रुपये, नगरपालिकेचा पोत्याला १० रुपये कर द्यावा लागत असल्याने झेंडू तोडून विक्रीला आणण्याचाही खर्च निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी झेंडू फेकून दिला. फटाका विक्रीवरही मोठा परिणाम झाल्याचे विक्रेते गणेश गाढवे, बाळासाहेब लेंडे, उमेश गायकवाड, अनिल पोकळे, बबलू मुदलियार यांनी सांगितले. कालपासून समोरच झेंडूचा बाजार भरला आहे. मात्र बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी येथेच झेंडू फेकून देत असल्याचेही त्यांनी सांगितले. आम्ही फटाके स्टॉल जागाभाडे, परवानगी आदीसाठी सुमारे १५ ते वीस हजार खर्च केले. लाखो रुपयांची गुंतवणूक केली, मात्र हा खर्चही निघेल की नाही, अशीच परिस्थिती असल्याचे स्टॉलधारकांनी सांगितले. पदरी केवळ निराशादसऱ्याला झेंडूने चांगला हातभार दिल्याने उत्पादक शेतकऱ्यांनी झेंडू दिवाळी सणासाठी राखून ठेवला होता. मात्र बाजारात त्यांची मोठी निराशाच झाली. कालपासून येथे झेंडूचा बाजार भरला असून बाजारात झेंडूची मोठी आवक झाली होती. झेंडू खरेदीला बाहेरगावाहून येणारे व्यापारीही कमीच होते. बाजारभाव अत्यंत कमी राहिल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. फटाक्याकडे पाठझेंडूच्या बाजारावर सणासुदीचे अर्थकारण येत असल्याने झेंडू बाजारालगतच असणाऱ्या फटाके स्टॉलवरही मोठा परिणाम जाणवला. शेतकरी झेंडूच्या विक्रीनंतर हमखास फटाके खरेदी करतात. यंदा मात्र शेतकरी फटाके स्टॉलकडे फिरकलेच नाहीत. झेंडूचं बारदान तरीयावं कामालाकिमान झेंडूचे बारदान तरी कामाला येईल, हीच माफक आशा असून यंदाची दिवाळी गोड झाली नसल्याच्याच प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून आल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी बाजारभावाचा अंदाज घेऊन झेंडू बाजारातच आणला नाही.