शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

इथे शासनाची मराठी ‘अनुज्ञेय’ राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 03:45 IST

राज्य सरकारने शासकीय व्यवहारात मराठी भाषा अनुज्ञेय केली आहे. नियमानुसार प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला याच भाषेत काम करणे अनिवार्य आहे; अन्यथा संबंधित जबाबदार अधिका-याच्या गोपनीय नस्तीमध्ये विपरित शेरे मारले जातील. सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या दिशानिर्देशानुसार ही कडक कारवाई करण्यात येत आहे.

पुणे - राज्य सरकारने शासकीय व्यवहारात मराठी भाषा अनुज्ञेय केली आहे. नियमानुसार प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याला याच भाषेत काम करणे अनिवार्य आहे; अन्यथा संबंधित जबाबदार अधिका-याच्या गोपनीय नस्तीमध्ये विपरित शेरे मारले जातील. सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या दिशानिर्देशानुसार ही कडक कारवाई करण्यात येत आहे.शेजारील इतर राज्याप्रमाणेच महाराष्ट्राचा कारभार मराठी भाषेतूनच चालवावा, यासाठी सरकारने शासन परिपत्रक काढले आहे. मराठी भाषकांचा हा अस्मितेचा विषय झाला आहे. महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४ नुसार जानेवारी १९६५ पासून राज्याची राजभाषा म्हणून मराठी भाषेचा स्वीकार करण्यात आला. शासकीय व्यवहार मराठी भाषेतून व्हावा, म्हणून वेळोवेळी परिपत्रके देखील काढण्यात आली आहे. अखेर पुन्हा एकदा ‘हरी ओम’ म्हणत मराठी भाषेचा अंगीकार करण्याबाबत विस्तृत परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यात काही इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द देखील देण्यात आले आहेत.एकूणच शासकीय व्यवहाराची भाषा पाहिल्यास अनेकांना ती इंग्रजीची मºहाठी वाघिणच वाटू शकते. बातमीची सुरुवात झाल्यानंतर, आपण परक्या मराठी मुलखात तर आलो नाही ना, असे अनेकांना वाटले असेल. तीच स्थिती सध्या मराठी शासकीय व्यवहार भाषेची आहे. विशेष म्हणजे, ७ मे २०१८ च्या परिपत्रकातदेखील संक्षिप्त शेºयांच्या लघुपुस्तिकेत अशाच परकीय वाटणाºया मराठी शब्दांची भर घातली आहे.भाषा ही सहज आणि सोपी असावी, असा संकेत शासन निर्णयात अजूनही पाळला जात नाही. कोणताही शासन निर्णय अथवा परिपत्रक पाहिल्यास आपले खास रंजन होऊ शकते. अन्न नागरी पुरवठा विभागाने नुकत्याच काढलेल्या एका परिपत्रकार लेव्हीची अदायगी देण्यासाठी सुस्पष्ट सूचना देण्यात आल्याचा उल्लेख केला आहे. महागाई परिगणना करण्या संदर्भात ही त्यात उल्लेख आहे. राज्य सरकारने १९८६ रोजी मराठी भाषेच्या वापराबाबत काढलेल्या परिपत्रकातही सुपरवायझरी स्लॅकनेसला पर्यवेक्षिय शैथिल्य नावाचा शब्द शोधला आहे. आपल्याकडे धान्याचे नियतन येते. निधी व्यपगत होतो. फाइल मॅनेजमेंट सिस्टीमचे भाषांतर ‘धारिका व्यवस्थापन प्रणाली’ असे केले जाते.अशा काहीच शब्दांची चर्चा येथे केलीआहे.निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अधिनियमांची घोषणामराठी भाषिकांनी शासनाच्या या निर्णयामुळे फार हुरळून जाण्याची गरज नाही. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. यात मराठीचे काही भले व्हावे असा विचार करणे चुकीचे आहे. शासनाला भाषेबाबत यापूर्वीच्या वर्षात नवीन धोरणे, नियम तयार करता आले असते. अशाच प्रकारचा कायदा हिंदी भाषेकरिता १९७२ मध्ये झाला होता; मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. कायदा झाल्यानंतर, तो अमलात येईल की नाही, याविषयी विचार करणे गरजेचे आहे. आपल्या राज्यात आपली भाषा हा विचार कौतुकास्पद आहे; मात्र त्याची अंमलबजावणी तितक्या प्रभावीपणे होणार का, हा प्रश्न आहे. त्यामुळे शासनाला येत्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून तर भाषेविषयीचा क ळवळा दाटून तर आला नसेल ना, असा प्रश्न पडतो.-डॉ. गणेश देवी (साहित्यिक व ज्येष्ठ भाषा अभ्यासक)अध्यादेश अधिकाधिक दुर्बोधइमिजिएट स्लीप याचे मराठी भाषांतर ‘तत्काळ पताका’ असे करण्यात आले आहे. पर्सनल फाइलला वैयक्तिक धारिका, प्लीज पुट अप फाइल म्हणजे ‘प्रकरणाची नस्ती प्रस्तुत करावी’, तर ‘ममो’ला ‘ज्ञाप’ असे म्हणतात हे संबंधित अध्यादेश वाचल्यावर कळते. प्रायोरीटिला सर्वप्राथम्य देणे असे म्हणतात याचादेखील उलगडा होतो. कृपया सूट द्यावी, याला कृपया क्षमापित करावे असादेखील पर्याय आहे.शासकीय अध्यादेश अधिकाधिक दुर्बोध अथवा समजण्यास अवघड करण्याचे काम यापुढेदेखील सुरूच राहणार, असे यातून दिसून येत आहे. शासकीय परिभाषा अशीच राहिल्यास सामान्य नागरिकांना त्यापासून दूर राहणेच बरे, असेच वाटेल; अन्यथा सरकारलाच परिपत्रकात शासकीय शब्दांचे अर्थ, अशी तळटीप देण्याची व्यवस्था करावी लागेल.फाइल, रेल्वे, टेलिफोन, स्लीप असे अनेक शब्द मराठीत विरघळलेले आहे. स्लीपला पताका म्हणणे तर नक्कीच विचित्र वाटेल असेच आहे. अशा शब्दांचा शासकीय परिपत्रकातील वापर पाहिल्यास टॉयलेट अथवा शौचालयाला ‘देह धर्म क्रिया केंद्र’ असे नाव देण्यासही शासकीय पत्रककर्ते मागे राहणार नाहीत असे वाटते.

टॅग्स :marathiमराठीnewsबातम्या