शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

मराठी बोलींचे सर्वेक्षण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 06:56 IST

भाषेचे जसे एक शास्त्र आणि व्याकरण असते, तसेच बोलींचेही व्याकरण असते; मात्र हा भाषावैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आत्तापर्यंत कुणीही अभ्यास केला नाही.

पुणे : प्रत्येक गावाची एक भाषा आणि बोली असते. जसे भाषेचे व्याकरण असते, तसे बोलीचेही असते. याच मराठी बोलींचा अभ्यास करण्यासाठी ‘मराठीच्या बोलींचे सर्वेक्षण’ (२०१७-२०२०) हा प्रकल्प डेक्कन कॉलेज पदव्युत्तर आणि संशोधन संस्था व राज्य मराठी विकास संस्था यांनी हाती घेतला आहे. मराठी बोलींचे व्याकरण काय आहे? त्यासंबंधी मराठी भाषेतील भौगोलिक आणि सामाजिक स्तरांवर आढळणाऱ्या काही निवडक व्याकरणिक विशेषांचे भाषावैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण करणे आणि भाषिक नकाशे तयार करणे या प्रकल्पातील महत्त्वपूर्ण टप्प्प्यांमुळे भविष्यात अभ्यासक आणि संशोधनाचा निश्चितच उपयोग होणार आहे.या प्रकल्पाच्या निमित्ताने डेक्कन कॉलेजमध्ये घेतलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा समारोप शुक्रवारी झाला. डेक्कन कॉलेजचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी प्रकल्पाची घोषणा केली. प्रमुख पाहुणे म्हणून राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. आनंद काटीकर उपस्थित होते. या प्रकल्पाला आर्थिक पाठबळ राज्य मराठी विकास संस्थेने दिले आहे. डेक्कन कॉलेजचे उप-कुलगुरू डॉ. प्रसाद जोशी, कॉलेजच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य अ‍ॅड. दादासाहेब बेंद्रे आणि मराठी अभ्यास परिषदेचे अध्यक्ष प्र. ना. परांजपे आदी या वेळी उपस्थित होते. प्रकल्पाच्या प्रमुख भाषाशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी आहेत.भाषेचे जसे एक शास्त्र आणि व्याकरण असते, तसेच बोलींचेही व्याकरण असते; मात्र हा भाषावैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आत्तापर्यंत कुणीही अभ्यास केला नाही. तो करण्यासाठीच या प्रकल्पाची आखणी करण्यात आली असल्याचे सांगून प्रकल्पाच्या प्रमुख भाषाशास्त्र विभागातील प्राध्यापक डॉ. सोनल कुलकर्णी-जोशी म्हणाल्या की, भाषावैज्ञानिक दृष्टिकोनातून बोलींचा अभ्यास क्वचित होतो.भाषिक नकाशे होणारया प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात ठिकठिकाणी जाऊन स्थळ आणि वयोमानानुसार मराठीच्या व्याकरणामधील विविधता जाणून घेतली जाणार आहे. भाषिक नकाशे तयार केले जाणार आहेत. या प्रकल्पात प्रत्यक्ष क्षेत्रपाहणी करणे, मुलाखती घेऊन भाषिक नमुने मिळविणे, त्यांचे प्रतिमांकन आणि भाषावैज्ञानिक विश्लेषण करणे या टप्प्यांतून हे काम पूर्ण केले जाणार आहे. प्रकल्पात तंत्रज्ञानाचा आणि सॉफ्टवेअरचा वापर करण्यात येणार आहे.

टॅग्स :marathiमराठी