शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : बेमुदत चक्री उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:45 IST

मराठा आरक्षणासाठी आचारसंहिता; आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन

पुणे : मराठा क्रांती मोर्चातर्फे आरक्षण लागू करावे, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्या सूत्रधारास शोधून काढावे यांसह विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर (कौन्सिल हॉल) सोमवारपासून (दि. २०) बेमुदत चक्री उपोषणाला सुरुवात करण्यात आली. नुकत्याच झालेल्या काही आंदोलनांना हिंसेचे गालबोट लागल्याने आंदोलनकर्त्यांसाठी आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. तिचे पालन करण्याचे आवाहन आंदोलकांकडून करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांकडून आचारसंहिता तयार करण्यात आली आहे. त्यानुसार दररोज वेगवेगळा गट उपोषणात सहभागी होणार आहे. दररोज सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत आंदोलक आंदोलन करतील. आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह आंदोलकांनी विविध मागण्या जाहीर केल्या आहेत. आंदोलनाच्या काळात आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळावी, त्यांना सरकारी नोकरी द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना देण्यात येणाºया आर्थिकदृष्ट्या मागास श्रेणी नियमात बदल करावा, प्रत्येक जिल्ह्यात वसतिगृह बांधावे, अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक नियमातील तरतुदींचा गैरवापर थांबवावा व त्यात दुरुस्ती करावी, कोपर्डी घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, मराठा समाजातील अधिकाºयांवर पदोन्नतीतहोणारा अन्याय थांबवावा अशा विविध १५ मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.आंदोलन दडपण्याचा प्रयत्नमराठा समाजातर्फे गेली दोन वर्षे शांततेच्या मार्गाने व अहिंसक पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. काही घटकांकडून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. गेल्या काही महिन्यांतील घटनांवरून ते स्पष्ट होत आहे. या आंदोलनात बाह्य शक्तींचा हात असल्याचे समोर आले आहे. त्याचा सूत्रधार कोण, याचा शोध सरकारने घ्यावा.अशी असेल आचारसंहिता...आंदोलन शांततेने व शिस्तीने करावे, आंदोलनाला गालबोट लागेल, असे कृत्य करू नयेप्रक्षोभक व भडकावू घोषणा व भाषण करू नयेआंदोलनात कोणता पक्ष अथवा संघटना म्हणून नव्हे, तर मराठा म्हणून सहभागी होणारआंदोलनादरम्यान झालेला कचरा, रिकाम्या बाटल्या कचरा पेटीत टाकणारआंदोलनात शांततेने सहभागी होणार आणि शांततेत घरी जाणारआंदोलनात अनुचित प्रकार करणाºयाला रोखणार आणि पोलिसांच्या ताब्यात देणार

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा