शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मराठा आरक्षणासाठी बंद : आंदोलकर्त्यांच्या जामिनावर आज निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 02:30 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलनादरम्यान तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत अटक केलेल्या १७० जणांच्या जामीन अर्जावर मंगळवारी निर्णय होणार आहे.

पुणे : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलनादरम्यान तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत अटक केलेल्या १७० जणांच्या जामीन अर्जावर मंगळवारी निर्णय होणार आहे. येरवडा पोलिसांनी हयात हॉटेलची तोडफोड केल्याप्रकरणी अटक केलेल्या १० जणांची जामिनावर सुटका करण्यात आली.मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान तोडफोड आणि जाळपोळ केल्याप्रकरणी १९२ जणांना अटक करण्यात आली होती. या आरोपींवर विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर शिवाजीनगर न्यायालयात एकाच सत्र न्यायालयासमोर सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष पवार यांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीराम मोडक यांच्याकडे अर्जाद्वारे केली होती. त्यानुसार विशेष न्यायाधीश के. डी. वडणे यांच्या न्यायालयात १७० जणांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली.पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सुभाष पवार, अ‍ॅड. हर्षद निंबाळकर, अ‍ॅड. एन. डी. पवार, अ‍ॅड. समीर घाडगे, अ‍ॅड. भूपेंद्र गोसावी, अ‍ॅड. रेखा करंडे आदी वकिलांनी आरोपींतर्फे बाजू मांडली.अटक आरोपींनी नेमकी तोडफोड काय केली आहे, अटक आरोपींचा नेमका काय सहभाग होता याची माहिती पोलिसांकडे नाही. त्यांच्यावर यापूर्वी कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत. सामाजिक मागणीसाठी ते एकत्र आले होते. त्यांचा गुन्हा करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद आरोपींतर्फे वकिलांनी केला. त्यांच्या जामीन अर्जावर मंगळवारी आदेश होणार आहे. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणCourtन्यायालय