शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

खेडमध्ये रविवारी मराठा संवाद यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 22:46 IST

मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीतर्फे समाज जनजागृतीसाठी राज्यात संवाद यात्रा काढणार असून रविवारी

राजगुरुनगर : मराठा क्रांती मोर्चा समन्वय समितीतर्फे समाज जनजागृतीसाठी राज्यात संवाद यात्रा काढणार असून रविवारी (दि. १८) खेड तालुक्यात राजगुरुनगर व चाकण येथे आगमन होणार असल्याची माहिती संयोजक शांताराम कुंजीर व मनोहर वाडेकर यांनी दिली.त्याच्या नियोजनाबाबत राजगुरुनगर येथे बैठक घेण्यात आली. याप्रसंगी अंकुश राक्षे, शंकर राक्षे, अ‍ॅड. अनिल राक्षे, अ‍ॅड. सुभाष करंडे, विशाल तुळवे, वामन बाजारे, सुदाम कराळे, प्रमोद गोतारणे, गौतम डावखर, कैलास मुसळे, सुदाम कराळे, एल. बी. तनपुरे, रमेश हांडे यांच्यासह आंबेगाव, जुन्नर, मावळ व पिंपरी-चिंचवड येथील पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रदेश समन्वयक शांताराम कुंजीर म्हणाले, की मराठा समाजाच्या प्रमुख २० मागण्यांसाठी राज्यात ५९ मूक मोर्चे काढून शांततामय मार्गाने आंदोलन केले. त्यातील तुरळक मागण्या मान्य झाल्या आहेत, मात्र प्रमुख मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही. दोन वेळा महाराष्ट्र बंद पुकारूनदेखील शासन गंभीरपणे दखल घेत नाही. यामुळे पुणे जिल्ह्यात १६ ते २४ नोव्हेंबरदरम्यान संवाद यात्रा काढून मराठा बांधवांच्या संघर्षाला दिशा देण्याचे काम करण्यात येणार आहे. २६ नोव्हेंबरला मुंबई येथे राज्यस्तरीय धडक मोर्चा जाणार असून मराठा समाजाच्या भावनांचा उद्रेक झाला तर त्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची राहील, असा इशारा कुंजीर यांनी दिला. मनोहर वाडेकर यांनी मनोगत व्यक्त करताना ३० जुलै रोजी चाकण आंदोलनाच्या वेळी गुन्हे दाखल केलेल्या मराठा बांधवांवरील गुन्हे त्वरित मागे घेण्याची मागणी केली व रविवारी राजगुरुनगर येथे ३ वाजता व चाकण येथे ४:३० वाजता मार्केट कमिटी आवारात उपस्थित राहण्याचे आवाहन केले. कैलास मुसळे यांनी सूत्रसंचालन केले. वामन बाजारे यांनी आभार मानले.मराठा समाजाच्या मागण्या...१. शासनाने सुरू केलेल्या सारथी संस्थेस पुरेसे मनुष्यबळ व निधी द्यावा. २. फक्त ४ जिल्ह्यांत वसतिगृहे सुरू असून उर्वरित ३२ जिल्ह्यांत वसतिगृहे सुरू करून तेथे भोजनव्यवस्था सुविधा दिली जावी. ३. एकूण ६०० कोर्सेस ५० टक्के सवलतीवर सुरू केले असूनदेखील अनेक ठिकाणी संपूर्ण फी आकारली जाते, ही पिळवणूक बंद व्हावी. ४. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातील असंख्य त्रुटी दूर करून कर्जवाटप प्रक्रिया सुलभ करावी. 

टॅग्स :Puneपुणेmarathaमराठा