शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

विद्यार्थिनींच्या छळवणुकीच्या अनेक कहाण्या

By admin | Updated: March 22, 2015 00:44 IST

घरी आई-वडिलांकडून मारहाण केली जाते... शाळेबाहेर टोळके त्रास देते... शिक्षक छेडछाड करतात... मित्र-मैत्रिणींकडूनच दुजाभाव केला जातो... व्यसनी मित्रांची संगत... अभ्यासात कमी...

पुणे : घरी आई-वडिलांकडून मारहाण केली जाते... शाळेबाहेर टोळके त्रास देते... शिक्षक छेडछाड करतात... मित्र-मैत्रिणींकडूनच दुजाभाव केला जातो... व्यसनी मित्रांची संगत... अभ्यासात कमी... यांसह विविध प्रकारच्या तक्रारी शाळकरी मुला-मुलींच्या असतात. त्यातून काही जण खेळण्या-बागडण्याच्या या वयात आपल्या इच्छा-अपेक्षांना मुरड घालतात. अबोल होतात. एकटे-एकटे राहतात. अनेकदा शाळेत शिक्षक आणि घरी आई-वडिलांकडूनही याकडे दुर्लक्ष केले जाते. कधी कधी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जाते. मग अशा वेळी अनेक विद्यार्थ्यांना आधार मिळतो तो समुपदेशकांचा. महापालिकेच्या शाळांमधील समुपदेशकांनी अशा अनेक मुला-मुलींना आपल्या कौशल्याने समस्यांतून बाहेर काढून त्यांच्यात सकारात्मकतेची बीजे रुजविली आहेत.महापालिका शिक्षण मंडळाच्या विविध माध्यमांच्या ३०६ शाळा असून, त्यांमध्ये सुमारे १ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मंडळाने व्यक्तित्व विकास प्रबोधिनी या संस्थेच्या माध्यमातून ५५ समुपदेशकांची नेमणूक केली आहे. हे समुपदेशक पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबतचे त्यांचे नाते दृढ झाले आहे. त्यांना बहुतेक विद्यार्थ्यांची गुणवत्ता, सवयी, समस्या माहीत आहेत. त्यामध्ये अचानक बदल दिसू लागल्यानंतर ही बाब समुपदेशकांच्या नजरेत लगेच भरते. मग खऱ्या अर्थाने त्यांच्या कामाला सुरुवात होते. प्रबोधिनीचे समन्वयक पवन गायकवाड म्हणाले, ‘‘प्रत्येक समुपदेशक दररोज ७ तास काम करतो. हे समुपदेशन ३ टप्प्यांत असते. वैयक्तिक समुपेशन, गट समुपदेशन आणि बुद्धिमत्ता चाचणी याद्वारे मुला-मुलींशी संवाद साधला जातो. एकदा समुपदेशन करून समस्या सुटत नाहीत. त्या विद्यार्थ्यांशी सातत्याने संवाद साधून पाठपुरावा करावा लागतो. मुली सहजासहजी बोलत नाहीत. मग कधी कधी त्यांच्या पालकांशीही बोलावे लागते. काही पालक त्याला प्रतिसाद देत नाहीत. मुलांना असलेली व्यसने, शाळेत सतत गैरहजर राहणे, खोडी काढणे, वागणे नीट नसणे अशा काही मुलांच्या तक्रारी असतात. त्या उघडपणे दिसतात; मात्र काही समस्या विशेष:त मुलींबाबत त्यांच्याशी थेट बोलावेच लागते. अनेक केसमध्ये गंभीर समस्या असल्याचे जाणवते. समुपदेशक वाढविण्याची गरज४पालिका शाळांमधील सुमारे १ लाख विद्यार्थ्यांसाठी केवळ ५५ समुपदेशक आहेत.४विद्याथ्र्सििंख्या जास्त असल्याने काम पूर्ण क्षमतेने करता येत नाही.४किमान १०० समुपदेशकांची गरज आहे. तरच, समुपदेशन अधिक परिणामकारक होईल, असे पवन गायकवाड यांनी सांगितले.४माहिती तंत्रज्ञानामुळे जग खूप जवळ आले; मात्र या विस्फोटाने पालक, शिक्षक व मुलांमधील संवाद नाहिसा होत चालला आहे. याचा थेट परिणाम मुला-मुलींच्या भावनिक विश्वावर होळ लागला आहे. त्यामुळे त्यांच्या भावनांना आपुलकीची साद घालणे गरजेचे बनले आहे. ४विद्यार्थ्यांना अनेक समस्या असतात. त्या समस्या जाणून घेत कौशल्याने विद्यार्थ्यांना बोलते करणे समुपदेशकांपुढे आव्हान असते. कारण शाळेतील मुले भीतीने किंवा इतर कारणांनी फारशी बोलत नाहीत. त्यातून गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. समुपदेशक आपल्या कौशल्याने त्यांना बोलते करतात.यासाठी गरजेचे आहे समुपदेशपालिकेच्या एका शाळेत शिकणारी मुलगी नियमितपणे शाळेत यायची; पण अचानक शाळा सुटण्याची वेळ आली, की घाबरून जाऊ लागली. एरवी मुुले-मुली शाळा सुटण्याची वाट बघतात. ही मात्र अबोल व्हायची. मैत्रिणींशीही फारशी बोलत नसे. काही दिवसांनी समुपदेशकांच्या लक्षात ही बाब आली. एक दिवस त्यांनी तिला बोलावून घेऊन तिच्याशी संवाद साधला. तिची समस्या जाणून घेतली, तेव्हा त्या मुलीने खरे कारण सांगितले. शाळा सुटण्याच्या वेळी एक मुलगा दररोज शाळेबाहेर उभा असायचा. ती शाळेबाहेर आली, की तो ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे,’ असे म्हणायचा. दररोज काही ना काही बोलायचा. त्यामुळे ती घाबरली होती. तिच्याशी जवळीक साधून समुपदेशकांनी समजूत काढली आणि त्याला ठामपणे नकार देण्यास सांगितले. त्यासाठी तिची मानसिक तयारीही करून घेतली. त्या दिवसानंतर तो मुलगाही शाळेबाहेर दिसला नाही आणि ती मुलगीही मोकळेपणाने वावरू लागली. तिची आई बाळंतपणासाठी माहेरी गेली होती. त्यामुळे ती मुलगी वडिलांसोबत राहायची. दररोज शाळेत हसत-खेळत असायची; पण काही दिवसांपासून तिच्या वागण्या-बोलण्यात फरक जाणवू लागला. ती अबोल झाली होती. एक दिवस तिने शाळेच्या गच्चीवरून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. शाळेतील समुपदेशकांनी तिला बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरूवातीला तिने काहीच सांगितले. विश्वास घेतले तेव्हा ती बोलू लागली आणि सर्वांनाच धक्का बसला. वडीलच अश्लील चाळे करतात, असे तिने सांगितले. पण, घाबरून जाऊन तिने कुणालाही सांगितले नव्हते. शेवटी वडिलांना शाळेत बोलावण्यात आले. समुपदेशकांनी त्यांचेही समुपदेशन केले. त्यांच्या कृत्याची जाणीव करून दिली. त्यानंतर हा प्रकार बंद झाला.