शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

Harshvardhan Patil: जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी अनेकांनी समजूतदारपणा दाखवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 17:02 IST

पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून योग्य कामे असतील, बँकेच्या दृष्टीने मदत करण्याची भूमिका असेल ती नक्की करू. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी बर्‍याच माणसांनी समजूतदारपणा दाखवला.

बारामती : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून योग्य कामे असतील, बँकेच्या दृष्टीने मदत करण्याची भूमिका असेल ती नक्की करू. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी बर्‍याच माणसांनी समजूतदारपणा दाखवला. आप्पासाहेब जगदाळे इंदापूर तालुक्यातून जे सांगतील ते आपण ऐकलं पाहिजे, असा स्पष्ट संदेश ज्यांना कुणाला द्यायचा आहे त्यांना आम्ही दिला आहे, अशा शब्दांमध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बिनविरोध निवडी मागील गुपित उघड केले.

 इंदापूर येथे गुरुवारी(दि.23) अप्पासाहेब जगदाळे यांची पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या इंदापूर तालुक्यातील अ प्रवर्गातून निवड झाल्याबद्दल सर्व सोसायटी प्रतिनिधी व शहर भाजप कार्यकारणीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी हर्षवर्धन पाटील बोलत होते. 

ते पुढे म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये हवेली, मावळ व शिरूर तालुक्यामध्ये निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर इंदापूर तालुक्यातील बऱ्याच लोकांनी समजूतदारपणा दाखवत ही निवडणूक बिनविरोध केली. ही आपल्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्ही सुद्धा वरिष्ठ पातळीवर चर्चा केली होती. केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या माध्यमातून पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेस केंद्राकडून धोरणात्मक निर्णयांसंदर्भात सहकार्य करता येईल, असेही यावेळी पाटील म्हणाले.

प्रास्ताविक इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड.शरद जामदार यांनी केले. यावेळी साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, भाजपचे ज्येष्ठ नेते मारुती वनवे, अँड. कृष्णाजी यादव, विलासबापू वाघमोडे, तानाजी थोरात, बाळासाहेब डोंबाळे-पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Baramatiबारामतीharshvardhan patilहर्षवर्धन पाटीलbankबँकElectionनिवडणूक