शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात कोरोनामुळे अनेक डायलिसिस सेंटर बंद;रुग्णांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 17:05 IST

कितीही इच्छा असली तरी नव्या लोकांना सामावून घेणे दवाखान्यांना अवघड पुण्यातील दवाखान्यांनी निर्जंंतुकीकरणाचा पर्याय अवलंबून रुग्णांची गैरसोय टाळावी.

ठळक मुद्देमदतीसाठी किडनी सपोर्ट ग्रुपचा पुढाकारपुण्यातील दवाखान्यांनी निर्जंंतुकीकरणाचा पर्याय अवलंबून रुग्णांची गैरसोय टाळावी

पुणे : सध्या पुण्यात कोरोनामुळे काही डायलेसिस युनिट्स बंद आहेत. त्यामुळे किडनीचा आजार असलेल्या रुग्णांची गैरसोय होत आहे. पुण्यात २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या किडनी सपोर्ट ग्रुपकडून मदतीचा हात दिला जात आहे. त्यांची इतर डायलिसिस सेंटरमध्ये सोय करून देण्यासाठी पुढाकार घेतला जात आहे. पुण्यातील दवाखान्यांनी निर्जंंतुकीकरणाचा पर्याय अवलंबून रुग्णांची गैरसोय टाळावी, अशी मागणी केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून अनेक दवाखाने किंवा डायलिसिस सेंटर सध्या बंद केली जात आहेत. त्यामुळे तिथे नियमित डायलेसिस करून घेणा?्या रुग्णांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होऊ लागली आहे. डायलेसिस वेळेत न केल्यास रुग्णांच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे किडनी सपोर्ट ग्रुपच्या माध्यमातून घाबरलेल्या रुग्णांशी संपर्क साधणे, त्यांना धीर देणे, इतर ठिकाणी सोय करण्याच्या दृष्टीने प्रयत्न अशी पावले उचलली जात आहेत, अशी माहिती सपोर्ट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अरुण देवगावकर यांनी 'लोकमत'ला दिली.ते म्हणाले, 'सगळ्या दवाखान्यांमध्ये डायलेसिसची शेड्यूल्स फिक्स असतात. आदर्श प्रमाण ५ तासांचे असले तरी एक डायलेसिस किमान ३.५ ते ४ तास तरी करावेच लागते. त्यामुळे कितीही इच्छा असली तरी नव्या लोकांना सामावून घेणे दवाखान्यांना अवघड जात आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. सेंटर बंद न करता निजंर्तुकीकरण करून घेणे, जास्त त्रास होत असलेल्या रुग्णांना प्राधान्य देणे असे उपाय अवलंबले जाणे गरजेचे आहे. काही ठिकाणांहून या धडपडीला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. रुग्णांच्या मदतीसाठी रुग्णालयांनी पुढे यायला हवे. या क्षेत्रातील माजी व आजी डॉक्टर्स, टेक्निशियन व इतर स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. आता रुग्णही एकमेकांना माहिती पुरवत आहेत.'डायलिसिसच्या रुग्णांनी काहीही समस्या उदभवल्यास किडनी सपोर्ट ग्रुपशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. रुग्णांसाठी संवाद मेळावे, तज्ञांची व्याख्याने, शंका निरसन चर्चासत्र, किडनीचा आजार होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना, सवलतीच्या दरात नियमित तपासण्या असे विविध उपक्रम राबवले जात आहेत. डायलिसिस सेंटरमधील मनुष्यबळ कमी झाले असल्याने आणि कोरोनाबाबत भीती वाढत असल्याने रुग्णांमध्ये घबराट निर्माण झाली आहे, असे निरीक्षणही देवगावकर यांनी नोंदवले. 

टॅग्स :Puneपुणेdialysisडायलिसिसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर