शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘माणूस’ लवकरच विकीपिडीयावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 20:03 IST

देशाच्या स्वातंत्र्यापासूनच आणि साठोत्तरी कालखंडात ‘माणूस’ साप्ताहिकाची स्थापना करण्यात आली. श्री.ज.माजगावकर यांनी या माध्यमातून लेखक आणि वाचकांची पिढी घडवली.

ठळक मुद्देपीडीएफ स्वरूपात असलेले हे अंक लवकरच विकीपिडीयावर उपलब्ध होणार डिजिटायझेशन झाल्यामुळे हा समग्र वैचारिक ठेवा यापुढील काळात सर्वांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खुला

पुणे : सकस स्वरूपाच्या वैचारिक लेखनातून वाचकांची पिढी घडवणाऱ्या ‘साप्ताहिक माणूस’च्या डिजिटायझेशनला उदंड प्रतिसाद मिळत आहे. भारतासह अमेरिका, सौदी अरेबिया, ओमान आणि नॉर्वे येथील मराठीप्रेमींकडून ‘माणूस’च्या अंकांना ‘हिट्स’ आल्या आहेत. पीडीएफ स्वरूपात असलेले हे अंक लवकरच विकीपिडीयावर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अनेकांना हा अमूल्य ठेवा युनिकोडमध्ये उपलब्ध होणार आहे. ‘माणूस’चे अंक पीडीएफ स्वरूपात उपलब्ध झाले आहेत. हे अंक युनिकोडमध्ये नसल्यामुळे एकेका अंकाची पीडीएफ फाईल उतरवून घ्यावी लागत आहे. यामधील तांत्रिक अडचणी लवकरच दूर करण्याचा प्रयत्न आहे. सध्या पीडीएफ स्वरूपात असलेल्या या अंकांमध्ये वेगवेगळ्या फॉन्टमध्ये मजकूर आहे. जवळपास ५० हजारांहून अधिक पृष्ठसंख्या असल्यामुळे मजकूर वेगळाच दिसत असल्याचे निदर्शनास आले आहे. ही तांत्रिक अडचण दूर करून ‘माणूस’चे अंक विकीपिडीयावर नेण्याचा मानस आहे. त्यामुळे अनेकांना युनिकोडमध्ये मजकूर उपलब्ध होणार आहे.देशाच्या स्वातंत्र्यापासूनच आणि साठोत्तरी कालखंडात ‘माणूस’ साप्ताहिकाची स्थापना करण्यात आली. श्री.ज.माजगावकर यांनी या माध्यमातून लेखक आणि वाचकांची पिढी घडवली. सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांनी लिहिते केले. ‘माणूस’कार श्री. ग. माजगावकर यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून माणूस प्रतिष्ठानने ३० वर्षांतील सर्व अंकांचे डिजिटायझेशन करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. गेल्या वर्षी ‘श्रीगमां’च्या २० व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यान्वित केलेला हा प्रकल्प यंदा २० फेब्रुवारीला पूर्णत्वास गेला.जुन्या अंकांना या साप्ताहिकाचे सर्व अंक पीडीएफ स्वरूपात गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्थेच्या ‘डिजिटल रिपॉझिटरी’मध्ये उपलब्ध झाले आहेत, अशी माहिती माणूस प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आणि श्रीगमांची कन्या वंदना भाले यांनी दिली. ‘माणूस’च्या या सर्व अंकांचे डिजिटायझेशन झाल्यामुळे हा समग्र वैचारिक ठेवा यापुढील काळात सर्वांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून खुला झाला आहे. श्री. ग. माजगावकर यांनी ‘माणूस’च्या माध्यमातून देशातील आणि जगभरातील ठळक घडामोडींचे सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक विश्लेषण केले. मराठी माणूस सकस माहितीने समृद्ध कसा होईल याकडे माजगावकर यांचा कटाक्ष होता. कोणत्याही घटनेवर ‘श्रीगमा’ काय म्हणतात याकडे वाचकांचे लक्ष असायचे. जुन्या काळातील या घडामोडींचा अभ्यास वाचन संशोधक, विद्यार्थी आणि अभ्यासकांना उपलब्ध झाला आहे.

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्य