शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

एकेरीत मनीष सुरेशकुमारचा उपांत्य फेरीत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:11 IST

अर्जुन कढेचे आव्हान संपुष्टात पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित ...

अर्जुन कढेचे आव्हान संपुष्टात

पुणे : महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) व डेक्कन जिमखाना यांच्या संलग्नतेने आयोजित केपीआयटी-एमएसएलटीए आयटीएफ डब्लूटीटी पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या मनीष सुरेशकुमारसह अमेरिकेच्या ऑलिव्हर क्रॉफर्ड व झेन खान, स्वीडनच्या जोनाथन म्रीधा या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर, एकेरीत अर्जुन कढेला पराभवाचा सामना करावा लागल्याने त्याचे आव्हान संपुष्टात आले.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत सहाव्या मानांकित भारताच्या मनीष सुरेशकुमार याने पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या ग्रेट ब्रिटनच्या हेन्री पॅटनचा टायब्रेकमध्ये ३-६, ७-६ (३), ६-४ असा पराभव करून दिमाखात उपांत्य फेरीत धडक मारली. हा सामना २ तास ५२ मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये ४-३ अशा फरकाने हेनरी आघाडीवर असताना त्याने मनीषची सर्व्हिस भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट ६-३ असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये मनीषने पुनरागमन करत हा सेट टायब्रेकमध्ये ७-६ (३) असा जिंकून बरोबरी साधली. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये आठव्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंनी सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सामन्यात ४-४ अशी बरोबरी झाली. अखेर मनीषने हेनरीची नवव्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट ६-४ असा जिंकून उपांत्य फेरीच्या दिशेने पाऊल टाकले.

अमेरिकेच्या चौथ्या मानांकित ऑलिव्हर क्रॉफर्ड याने भारताच्या सातव्या मानांकित अर्जुन कढेचा टायब्रेकमध्ये ६-३, ७-६ (५) असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. हा सामना १ तास ४३ मिनिटे चालला. पहिल्या सेटमध्ये ऑलिव्हरने सुरेख सुरुवात करत अर्जुनची तिसऱ्या, पाचव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व सामन्यात ४-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर पुढच्याच गेममध्ये अर्जुनने ऑलिव्हरची सर्व्हिस भेदून ही आघाडी कमी केली. परंतु आघाडीवर असलेल्या ऑलिव्हरने अर्जुनची सर्व्हिस मोडत नवव्या गेममध्ये पुन्हा सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट ६-३ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये अर्जुनने ३-० अशी आघाडी घेतली. पण ऑलिव्हरने जोरदार खेळ करत चौथ्या गेममध्ये अर्जुनची सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत पिछाडी कमी केली. त्यानंतर हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये ५-५ अशी बरोबरी असताना अर्जुनने दुहेरी चूक केली व याचा फायदा घेत ऑलिव्हरने हा सेट ७-६ (५) असा जिंकून विजय मिळवला.

स्वीडनच्या पाचव्या मानांकित जोनाथन म्रीधाने दुसऱ्या मानांकित आर्यलँडच्या सिमॉन कारचा ७-५, २-६, ६-१ असा तीन सेटमध्ये पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. अमेरिकेच्या आठव्या मानांकित झेन खानने ग्रेट ब्रिटनच्या तिसऱ्या मानांकित एडन म्युकुकचा ४-६, ६-४, ६-० असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

दुहेरीत उपांत्य फेरीत स्वित्झर्लंडच्या लुका कॅस्टेलनुव्हो व भारताच्या अर्जुन कढे या जोडीने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या अन्वित बेंद्रे व परीक्षित सोमाणी या जोडीचा ६-४, ६-४ असा, तर आर्यलँडच्या सिमॉंन कार व अमेरिकेच्या अलेक्झांडर कोटझेन यांनी अमेरिकेच्या झेन खान व चेक प्रजाकसत्ताकच्या डालिबोर सेव्हर्सिना यांचा ६-४, ३-६, १०-७ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल : उपांत्यपू फेरी : एकेरी : पुरुष :

जोनाथन म्रीधा (स्वीडन) [५] वि.वि. सिमॉन कार (आर्यलँड) [२] ७-५, २-६, ६-१;

झेन खान (अमेरिका) [८] वि.वि. एडन म्युकुक (ग्रेट ब्रिटन) [३] ४-६, ६-४, ६-०;

ऑलिव्हर क्रॉफर्ड (अमेरिका) [४] वि.वि. अर्जुन कढे (भारत) [७] ६-३, ७-६ (५);

मनीष सुरेशकुमार (भारत) [६] वि.वि. हेनरी पॅटन (ग्रेट ब्रिटन) ३-६, ७-६ (३), ६-४;

दुहेरी गट : उपांत्य फेरी :

लुका कॅस्टेलनुव्हो (स्वित्झर्लंड) / अर्जुन कढे (भारत) [२] वि.वि. अन्वित बेंद्रे (भारत) / परीक्षित सोमाणी (भारत) ६-४, ६-४;

सिमॉंन कार (आर्यलँड) / अलेक्झांडर कोटझेन (अमेरिका) वि.वि. झेन खान (अमेरिका) / डालिबोर सेव्हर्सिना (चेक प्रजासत्ताक) ६-४, ३-६, १०-७.

फोटो - मनीष सुरेशकुमार