शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मांढरदेवीची आजपासून यात्रा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 02:17 IST

राज्यात प्रसिद्ध असलेली मांढरदेवी यात्रा आजपासून सुरूझाली आहे. मात्र, प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची, वाहनांच्या पार्किंगची सुविधा, फायर ब्रिगेड, स्वच्छतागृह आदी सुविधा करण्यात आल्या आहेत; मात्र पहिल्या दिवशी भाविकांची खूपच तुरळक गर्दी राहिली.

भोर : राज्यात प्रसिद्ध असलेली मांढरदेवी यात्रा आजपासून सुरूझाली आहे. मात्र, प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची, वाहनांच्या पार्किंगची सुविधा, फायर ब्रिगेड, स्वच्छतागृह आदी सुविधा करण्यात आल्या आहेत; मात्र पहिल्या दिवशी भाविकांची खूपच तुरळक गर्दी राहिली.मांढरदेवीची काळुबाईची यात्रा १, २, ३ जानेवारी अशी आहे. त्यानिमित्त उपविभागीय अधिकारी मौसमी बर्डे व तहसीलदार वर्षा शिंगण यांनी सर्व विभागांची बैठक घेऊन सूचना केल्या होत्या. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरचे खड्डे भरले आहेत. घाटातील दरडी, गवत काढून रस्ता रुंद करणे, रंगरंगोटी व रिफलेक्टर नामफलक लावण्यात आले आहेत. भोर-मांढरदेवी रस्त्यावर वाघजाईनगरजवळ व गोकवडी गावाजवळ अरुंद मोरी आहे तिचे रुंदीकरण न झाल्याने दुहेरी वाहातुकीस अडथळा येत असल्याने एकेरी वाहतूक करावी लागते आहे. त्या ठिकाणी वाहनचालकांच्या माहितीसाठी रिफलेक्टर लावण्यात आले आहेत. कापूरहोळ-मांढरदेवी दरम्यानच्या रस्त्यावरील सर्व कामे पूर्ण झाली आहेत. रस्ता वाहतुकीस सुरळीत करण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता ठाणगे यांनी सांगितले.आरोग्य विभागाकडून आंबाडखिंड घाटाखाली एक आरोग्य पथक दिवस-रात्र ठेवण्यात आले आहे. भोर-आंबाडे गावापर्यंतच्या विहिरींच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून सुमारे २५ जादा गाड्यांची सोय करण्यात आली आहे. वाहनचालकांची तापासणी करून मद्यप्राशन केलेले नाही, याची खात्री केली जात असून नंतरच वाहने सोडली जात आहे. तर गाड्या भरल्या की, मांढरदेवीला पाठवल्या जातात, त्यासाठी स्पीकरवर जाहीर केले जात आहे. मात्र, भाविकच नसल्याने अनेक एसटी गाड्या स्टँडवर उभ्या आहेत.पहिल्या दिवशी तुरळक गर्दीसह्याद्री सर्च अँड रेसक्यु फोर्स, पुणे हे मांढरदेवी यात्रा काळात वाहतुकीचा खोळंबा, दर्शन रांगा लावण्यासाठी मदत करीत आहेत.यात्राकाळात कोंबडी-बकरी कापता येत नाही. मद्यपान करता येत नाही, ढोल वाजवणे, अंगात आणणे करता येत नसून पोलिसांचा ससेमिरा मागे लागतो. त्यामुळे यात्रा काळात फारसे भाविक मांढरदेवीला येत नाहीत, तर यात्राकाळ संपल्यावर मंगळवार व शुक्रवारी एकच गर्दी करतात.

टॅग्स :Puneपुणेcultureसांस्कृतिक