शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गोविंदाच्या नृत्यावर मंचरकर धुंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 02:03 IST

चित्रपट अभिनेते गोविंंदा यांनी अचानक व्यासपीठावर येऊन नृत्य करून उपस्थितांना धक्का दिला

मंचर : चित्रपट अभिनेते गोविंंदा यांनी अचानक व्यासपीठावर येऊन नृत्य करून उपस्थितांना धक्का दिला. क्रेनच्या साहाय्याने व्यासपीठावर येणारे कलाकार क्षणोक्षणी उत्साह वाढवीत होते. मराठी मालिकांमधील नामावंत कलाकारांची हजेरी, विनोद निर्मिती, सात एकर मैदानात प्रेक्षकांनी केलेली गर्दी हे मंचर येथील कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढले. गोवर्धन प्रकल्पाच्या वतीने आयोजित उत्सव आनंदाचा या कार्यक्रमाने मंचरकरांची मने जिंकली.विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या ६२ व्या वाढदिवसानिमित्त गोवर्धन उद्योग समुहाच्या वतीने हे आयोजन केले होते. शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, प्रितम शहा व शहा परिवाराने या कार्यक्रमाचे नियोजन केले. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. टीव्ही मालिकेतील कलाकार क्रेनद्वारे व्यासपिठावर आले आणि आनंदाचा उत्साह ओसंडून वाहण्यास सुरुवात झाली. विनोदी अभिनेता भाउ कदमच्या ट्रॅक्टरमधून एन्ट्रीला प्रेक्षकांनी दाद दिली. वैशाली बसने हिच्या गाण्यावर उपस्थितांनी ठेका धरला. राणा, अंजली, गुरुनाथ, शनया, शितल, आज्या यांनी व्यासपीठावर येवून एकत्रितपणे एक पोरगी, ही पोली साजुक तुपाजली, ओ काका आदी गाण्यावर नृत्य केले. शेतकरी मुलाचे परदेशी मुलीशी लग्न या नाट्याने विनोदाची हवा भरली.कार्यक्रमाचे नियोजन देवेंद्र शहा, प्रितम शहा, प्रिती शहा, नेत्रा शहा, पुजन शहा, अक्षाली शहा यांनी केले. कार्यक्रमाचे संयोजन चांगले झाले. बैठक व्यवस्था चांगली असल्याने इतकी गर्दी होवूनही कोठेही अनुचित प्रकार घडला नाही. बैठकीसाठी स्टेडीअम बनविले होते. प्रेक्षकांना पडद्यावर कार्यक्रम पाहण्याची व्यवस्था केली होती. वळसे पाटील यांच्या भाषणाला उपस्थितांनी दाद दिली. देवेंद्र शहा यांनी तालुक्याचे बदललेले स्वरुप विशद केले. वळसे पाटील यांची कन्या पुर्वा वळसे हिने जनतेशी संवाद साधताना केलेले भाषण अनेकांना भावले.निवेदक निलेश साबळे याने आता तुम्हाला सरप्राईज आहे असे सांगितले त्यानंतर सिनेअभिनेता गोविंदा यांचे आगमन अनेकांना धक्का देणारे ठरले. मात्र गोविंदा जेव्हा नृत्य करु लागला तेव्हा अनेकांचा विश्वास बसत नव्हता. गोविंदाने त्याच्या जुन्या गाण्यांवर हटके डान्स केला. साबळे यांना त्याने डान्सच्या स्टेप्स शिकविल्या. गोविंदाने वळसे पाटील यांना शुभेच्छा दिल्या.अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने क्रेनद्वारे धडाकेबाज एन्ट्री केली. तिने नृत्य सादर केले. आनंद शिंंदे व आदर्श शिंंदे यांच्या गाण्यावर उपस्थितांनी ठेका धरला. नवीन पोपट हा, डोकं फिरलंया ही गाणी दाद मिळवून गेली. मानसी नाईकची लावणी, सावनी रवींद्रच्या गायनाला मिळाली. विनोदी मालिकेतील कलाकारांनी ‘बाहुबली’ सादर करुन उपस्थितांना हसायला लावले.

टॅग्स :GovindaगोविंदाPuneपुणे