राजगुरुनगर : राजगुरुनगर येथे सिद्धेश्वर मंदिर आवारात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या २२ वर्षीय तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पथकाने जेरबंद केले आहे. पोलिसांनी गुरुवारी संध्याकाळी ही कारवाई केली. तोशिब बशिर शेख (वय २०, रा. दोंदे, ता. खेड) असे अटक आरोपीचे नाव आहे. गणेशोत्सवाच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक खेड उपविभागात गस्त घालीत असताना त्यांना एक व्यक्ती गावठी पिस्तुलासह राजगुरूनगर येथील सिद्धेश्वर मंदिर परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाचे सहायक निरीक्षक रविंद्र मांजरे, पोलीस कर्मचारी सुनिल जावळे, शरद बांबळे, शंकर जम, पोलीस नाईक दिपक साबळे यांनी पंचांसमवेत सापळा लावला.त्याला ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेण्यात आली. त्याच्याकडे एक पॅटच्या खिशात गावठी बनावटीचे पिस्तुल व एक काडतूस मिळून आले. या गावठी कट्ट्याची किंमत १५ हजार रुपये असून त्याला पुढील कारवाईसाठी खेड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
राजगुरुनगर येथे गावठी पिस्तूलासह एकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 21:46 IST