घोडेगाव : माळीण दुर्घटनेतून बचावलेल्या लोकांसाठी बांधण्यात आलेली 25 तात्पुरती घरे उद्या (दि.5) माळीणकरांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव माळीणमध्ये येणार असून, या वेळी ग्रामस्थांसमवेत बैठक घेण्यात येणार आहे.
दि. 3क् जुलै रोजी
माळीणमध्ये दुर्दैवी घटना घडून 151 लोक मृत्युमुखी पडले. या घटनेतून मृत्युमुखी पडलेल्या वारसांना
जागा पाहून पक्की घरे बांधून देण्यात येणार आहेत.
ही पक्की घरे होईर्पयत राहण्यासाठी माळीण फाटय़ावर असलेल्या शाळेत तात्पुरती पत्र्यांची घरे बांधण्यात आली आहेत. पावसाचा कामात अडथळा येत असल्याने, ही घरे बांधण्यास
उशीर झाला. परंतु, आता ही पत्र्यांची शेड बांधून पूर्ण झाली असून, याचा ताबा माळीणग्रामस्थांना देण्यात येणार आहे.
या पत्र्यांच्या घरांमध्ये न्हाणीघर, सिमेंट घोटाई करून भुई, पुढे प्रशस्त व्हरांडा करण्यात आला आहे. घरात हवा खेळती राहावी, यासाठी पुढे जाळी व मागून खिडकी ठेवण्यात आली आहे. तसेच, शौचालय व पाणी योजनाही या घरांसाठी करण्यात आली आहे. ही शेड बांधण्यासाठी कमी जागा उपलब्ध झाल्यामुळे कमी जागेत 25 शेड बसविण्यात आली
आहेत.
माळीण ग्रामस्थांची अजून 6 शेड व जनावरांसाठी गोठा बांधून देण्याची मागणी आहे. ही घरे
अपुरी पडणार असून, आणखी शेड बांधण्यात यावेत, असे माळीणकरांचे म्हणणो आहे.
या घरांचा ताबा देण्यासाठी जिल्हाधिकारी सौरभ राव,
प्रांताधिकारी कल्याण पांढरे
दि. 5 रोजी माळीणमध्ये येणार आहेत. ज्या कुटुंबांना खरोखर गरज आहे, अशा 25 कुटुंबाना ही घरे देण्यात
येणार आहेत. तसेच, गरज पाहून
अजून घरे बांधण्यात येणार आहेत. (वार्ताहर)
4कायमच्या पुनर्वसनासाठी आडिवरे, कोकणोवाडी व झांझरेवाडी या तीन जागा पाहिल्या होत्या; परंतु या तिन्ही जागा नाकारण्यात आल्या आहेत. नव्याने पाहण्यात आलेली माळीण फाटय़ावरील कशाळेवाडीच्या जागेची मोजणी व जीएसआयचा अहवाल घेण्याचे काम सुरू आहे. त्यांचा सकारात्मक अहवाल आल्यानंतर, ही जागा निश्चित केली जाईल. निवडणुकीनंतरच माळीणच्या कायमस्वरूपी पुनर्वसनाच्या प्रश्नावर तोडगा निघू शकेल.