शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

‘गो ग्रीन’ जीवनाचा भाग बनवा

By admin | Updated: January 13, 2017 01:55 IST

‘हरित बना’ (गो ग्रीन) हा आपल्या दैनंदिन जीवनातला भाग बनवा व याची स्वत:पासून सुरुवात केली

शिरूर : ‘हरित बना’ (गो ग्रीन) हा आपल्या दैनंदिन जीवनातला भाग बनवा व याची स्वत:पासून सुरुवात केली तर संपूर्ण जग हरित होण्यास वेळ लागणार नाही, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी येथे व्यक्त केले. यासाठी नव्या पिढीला उद्युक्त करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. जगाच्या पाठीवर सध्या भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांपैकी औद्योगिकीकरण व त्यामुळे निर्माण होणारी कीटकनाशके, रासायनिक खते, प्लॅस्टिकनिर्मिती, पाणी, मातीचे प्रदूषण अशा निर्माण होत चाललेल्या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दोनदिवसीय ‘गो ग्रीन’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी डॉ. शिंदे बोलत होते. ‘कोरियन असोसिएशन फॉर ग्रीन कॅम्पस’ इनिशिएटिव्हचे अध्यक्ष प्रा. डॉ. यून हे कीम यांच्या हस्ते सरस्वतीपूजन व दीपप्रज्वलनाने परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. तिरुपती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दामोदरम, प्रा. डॉ. श्रीनिवास, स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, शिरूर शिक्षण प्रसारक  मंडळाचे सहसचिव मा. प्राचार्य नंदकुमार निकम, बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, परिषदेचे समन्वयक प्रा. डॉ. बी. आर. खोत, फोटोग्राफी व पब्लिकेशन विभागाचे समन्वयक प्रा. डी. एच. बोबडे, संशोधन करणारे प्राध्यापकवर्ग व विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. डॉ. शिंदे म्हणाले, हरित बनण्यासाठी हरित विचार व हरित आचारण करणे गरजेचे आहे. प्रदूषणाविषयी ते म्हणाले, आपली जीवनपद्धती प्रदूषणाच्या समस्येला कारणीभूत आहे. गरजा मर्यादित करणे, साधनसामग्रीचा योग्य वापर याचा अवलंब करताना कचरा  कमी करण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे.  आपला आनंदोत्सव समाजासाठी त्रासदायक ठरता कामा नये. आपले जीवन मनी (पैसा)  केंद्रीत नव्हे, तर आरोग्यकेंद्रीत असले पाहिजे, अशी अपेक्षाही डॉ. शिंदे  यांनी व्यक्त केली.  डॉ. दामोदर यांनी पाणी व ऊर्जा याचे महत्त्व विषद करताना या दोन्ही घटकांचे संवर्धन करण्याची गरज व्यक्त केली. उघड्यावरील डंपिंग कचरा, प्लॅस्टिक कचरा, पर्यावरणविषयक कायदे व नियमांचा अभाव याविषयी चिंता व्यक्त केली. हरित बनण्यासाठी (गो ग्रीन) पर्यावरणपूरक विचार अंगिकारण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मा. प्राचार्य निकम यांनीही गो ग्रीनसाठी प्रत्येकाने मनाने हरित बनण्याची अपेक्षा व्यक्त केली. यासाठी जबाबदार नागरिक बनून दुसऱ्यांनाही या जबाबदारीचीजाणीव करून दिली पाहिजे.  आपल्या देशात ३६५ दिवस सूर्याचा लख्ख प्रकाश आपल्याला मिळतो. मात्र, त्याचा आपण किती योग्य वापर करतो, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. चीन, श्रीलंकेत ज्याप्रमाणे गो ग्रीनसाठी पावले उचलली गेली. त्याप्रमाणे आपल्या देशातही तशी पावले उचलली गेली पाहिजे, अशी अपेक्षा निकम यांनी व्यक्त केली.  परिषदेचे आयोजक प्राचार्य डॉ. मोहिते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. एन. एम. घनगावकर यांनी सूत्रसंचालन केले. परिषदेचे समन्वयक प्रा. खोत यांनी आभार मानले. (वार्ताहर)