शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाला मनुष्यबळ उपलब्ध करून द्या, पालिका आयुक्तांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 14:19 IST

राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना पत्रव्यवहार करुन बीएलओ म्हणून काम करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना मुख्य सचिव सुमीत मल्लिक यांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्दे मतदार नोंदणीपासून अद्याप वंचित राहिलेल्या महिला, आदिवासी, अशिक्षित, तृतीयपंथी आदी मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.मतदार यादी तयार करताना  ‘ईआरओ-एनईटी’ या नवीन संगणक प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत.जनजागृती करण्यासाठी पालिका आयुक्तांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन आयोगाने केले आहे.

पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यामध्ये ३ आॅक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीमध्ये मतदार नोंदणी आणि तसेच मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण मोहीम घेण्यात येत आहे. मतदार नोंदणी तसेच निवडणूक काळामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून काम करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. शासकीय कर्मचार्‍यांमध्ये याबाबत उदासिनता असते. त्यामुळे शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने पुढाकार घेत कर्मचाकार्‍यांची जुळवाजुळव करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. राज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना पत्रव्यवहार करुन बीएलओ म्हणून काम करण्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याच्या सूचना मुख्य सचिव सुमीत मल्लिक यांनी दिल्या आहेत.मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाद्वारे १ जानेवारी २०१८ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणार्‍या नवतरुण मतदारांसह, मतदार नोंदणीपासून अद्याप वंचित राहिलेल्या महिला, आदिवासी, अशिक्षित, तृतीयपंथी आदी मतदारांची नोंदणी करण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. यासोबतच आगामी काळामध्ये अनेक महत्वाच्या महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम घोषित होण्याचीही शक्यता आहे. २०१९ मध्ये विधान सभा व लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकाही अपेक्षित आहेत. त्यामुळे मतदार यादीमध्ये अधिकाधिक मतदारांचा समावेश करणे, दोष विरहीत व शुद्ध मतदार यादी तयार करणे अपेक्षित आहे. त्यासाठी बीएलओंची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता भासणार आहे. मतदार यादी तयार करताना  ‘ईआरओ-एनईटी’ या नवीन संगणक प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. या प्रणालीनुसार बीएलओ ने प्रत्येक मतदाराच्या अर्जाची प्रत्यक्ष भौतिक पडताळणी (फिजीकल व्हेरीफिकेशन) करणे आवश्यक  आहे. त्यामुळे बीएलओंची जबाबदारी महत्त्वपूर्ण असणार आहे. कामाचे स्वरुप आणि व्याप्ती पाहता पुरेशा प्रमाणात बीएलओच्या सेवा उपलब्ध होणे अधिक महत्त्वाचे आहे. या कामासाठी जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केलेल्या मागणीनुसार महापालिकेच्या आस्थापनांवरील कर्मचार्‍यांचे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पत्राद्वारे देण्यात आल्या आहेत. मतदार होण्यास पात्र असलेल्या १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांची मतदार यादीमध्ये नोंद व्हावी या हेतूने निवडणूक आयोगाने मोहीम हाती घेतलेली आहे. ही मोहीम आणि तिचा हेतू यशस्वी व्हावा म्हणून जनजागृती करण्यासाठी पालिका आयुक्तांनीही पुढाकार घ्यावा असे आवाहनही आयोगाने केले आहे. आगामी काळात राज्यातील काही महत्त्वाच्या महापालिकांमध्ये होणार्‍या निवडणुका लक्षात घेता मतदारयादी सर्वसमावेशक करण्यासाठी आणि जनतेला मोहिमेची माहिती व्हावी म्हणून पालिकांच्या निधीचा वापर करण्यात यावा, असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :Electionनिवडणूकcommissionerआयुक्त