शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

‘मायलेकरा’च्या अमूर्त नात्याला मिळाले शब्दरुपी कोंदण!; पुणेकरांनी अनुभवला उत्कट भावानुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 12:58 IST

रा. चिं. ढेरे स्नेहपरिवारातर्फे आई आणि मुलं यांच्या आंतरसंबंधांचा वेध घेणारा ‘मायलेकरं’ हा उत्कट भावानुभव शुक्रवारी रसिकांनी अनुभवला. अभिवाचनातून माय-लेकरांचे नाते अलवार उलगडत गेले.

ठळक मुद्दे‘मायलेकरं’ मधून येत गेले ‘काळ बदलला तरी काळीज बदलत नाही’, याचे प्रत्यंतर रा. चिं. ढेरे स्नेहपरिवारातर्फे कार्यक्रमाचे आयोजन

पुणे : सृष्टीच्या चराचरातील निर्मितीचा प्रत्यय देणारं नातं म्हणजे ‘मायलेकरं’! उत्कटता, आर्तता, व्याकुळता अशा भावनांचा अनोखा मिलाफ...अमूर्त नात्याला शब्दरुपाने मिळालेले मूर्त कोंदण... कविता, कथांमधून पाझरलेला वात्सल्याचा झरा... असा उत्कट भावानुभव उपस्थितांनी गुरुवारी अनुभवला. अभिवाचनातून माय-लेकरांचे नाते अलवार उलगडत गेले आणि ‘काळ बदलला तरी काळीज बदलत नाही’, याचे प्रत्यंतर ‘मायलेकरं’ मधून येत गेले.रा. चिं. ढेरे स्नेहपरिवारातर्फे आई आणि मुलं यांच्या आंतरसंबंधांचा वेध घेणारा ‘मायलेकरं’ हा उत्कट भावानुभव शुक्रवारी रसिकांनी अनुभवला. या कार्यक्रमाचे निवेदन, निवड आणि गुंफण डॉ. अरुणा ढेरे यांची होती. ढेरे यांच्यासह वीणा देव, गिरीश ओक आणि आशुतोष जावडेकर यांनी अभिवाचन केले. अनुराधा मराठे यांचे सुरेल गीतात्म सादरीकरणाने कार्यक्रमाचा परमोच्च बिंदू गाठला.‘निज रे निज छंद ताला रे, नंदलाला रे’ ही अंगाई, आचार्य अत्रे यांचे ‘दिनूचे बिल’ ही कथा, शांता शेळके यांची ‘आई म्हणजे तव्यावरची गरम पोळी’, ‘सकाळी कमी जेवलो तर आईला कसे कळते’ अशा कवितांमधून आईशी बाळाची जुळलेली नाळ कशा प्रकारे अधिकाधिक घट्ट होत जाते, याची अनुभूती आली. ‘जोपर्यंत आईच्या मुठीत आपलं बोट असतं, तोवर बालपण शाबूत असतं. मात्र, बोट सुटल्यावर आधाराची खरी जाणीव होते’, अशा रसपूर्ण निवेदनातून डॉ. अरुणा ढेरे यांनी नात्याचे विविध पदर उलगडून दाखवले. संजीवनी मराठे यांच्या ‘बरं का गं आई’ या कवितेतून आईची आई होण्याचा चिमुरडीचा प्रवास, फ्रँक कॉकनर यांच्या कथेतून आईला इतर कोणाशीही शेअर न करण्याचा चिमुकल्याचा बालहट्ट, गौरी देशपांडे यांच्या ‘मिमी आणि आई’ या कथेतून आई आणि लेकीमधला लटका राग आणि त्यामागील काळजी अशा भावनांच्या हिंदोळयांवर उपस्थितांनी सैर केली. इंदिरा संत यांच्या ‘घरातला मोठा मुलगा’ या कवितेतून मुलांचे वाढते वय, आई आणि मुलांमधील तुटत चाललेला संवादाचा पूल, पद्मा गोळे यांच्या ‘आईपणाची भीती’ या कवितेतून आईला वाटणारी आधुनिक जगाची भीती, अगतिकता, शोभा डे यांनी मुलांना लिहिलेले पत्र, नीलिमा माणगावे यांच्या कवितेतून अनुभवायला मिळालेलं अदभूत वळणावर येऊन ठेपणारं मायलेकीचं नातं, बहिणाबाई चौधरी यांची ‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ तर अरुणा ढेरे यांची ‘पोर जन्मा आली तेव्हा, बाप म्हणाला कचरा, मीच म्हणाले असू द्या माझ्या जीवाला आसरा’ अशा एकाहून एक सरस कवितांनी रसिकांच्या हृदयाचा ठाव घेतला.

टॅग्स :Puneपुणे