शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पर्यटननगरीमध्ये येणार महिलाराज

By admin | Updated: October 6, 2016 03:21 IST

लोणावळा नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले असल्याने पुढील पाच वर्षे पर्यटननगरीमध्ये महिलाराज येणार

लोणावळा : लोणावळा नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाले असल्याने पुढील पाच वर्षे पर्यटननगरीमध्ये महिलाराज येणार आहे.लोणावळ नगर परिषद निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. परिषदेची निवडणूक ही द्विसदस्यीय पद्धतीने, तर नगराध्यक्ष निवड थेट जनतेमधून होणार असल्याने अध्यक्षपदाला महत्त्व प्राप्त झाले आहे. सर्वांच्या नजरा आरक्षण सोडतीकडे लागल्या होत्या. नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याने सर्वसाधारण प्रभागातील इच्छुकांचा मात्र चांगलाच हिरमोड झाला आहे.राज्यातील आगामी नगरपालिका निवडणुकांसाठी नगराध्यक्षपदाची सोडत बुधवारी मुंबईमध्ये काढण्यात आली. या वेळी लोणावळा नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्याचे समजल्यानंतर महिलांनी जल्लोष केला. सर्वसाधारण प्रवर्गातील इच्छुकांनी नाराजी व्यक्त केली. वाढीव लोकसंख्येनुसार या वर्षी नगर परिषदेचा एक वॉर्ड वाढून वॉर्डची संख्या २५ झाली आहे. द्विसदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार १२ वॉर्डांमधून २५ जण आपले नशीब आजमावणार आहेत. २५ पैकी १३ जागा महिलांसाठी राखीव असून, नगराध्यक्षपददेखील महिलेसाठी राखीव झाल्याने नगर परिषदेमध्ये पुढील पाच वर्षे १४ महिला व १२ पुरुष असे समीकरण असणार असल्याने खऱ्या अर्थाने महिलाराज येणार आहे. (वार्ताहर)नगराध्यक्षपदासाठी इच्छुक संख्या अधिक४नगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, कॉग्रेसच्या महिला ध्यक्षा संध्या खंडेलवाल, राष्ट्रवादी महिलाध्यक्षा अरुणा लोखंडे, शिवसेनेच्या संगीता कंधारे, सौम्या शेटटी, कॉँग्रेसच्या नगरसेविका शादान चौधरी, रेखा जोशी, भाजपाच्या महिला शहराध्यक्षा अपर्णा बुटाला या दावेदार असू शकतात. त्यामुळे नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे.