शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

माहेश्वरी फुटबॉल लीग : गॅरॉन ग्लॅडिएटर्स, व्ही नाईन रॉकर्स चॅम्पियन!  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 03:42 IST

महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित माहेश्वरी फुटबॉल लीगच्या दुसºया सत्रात किड्स गटामध्ये व्ही नाईन रॉकर्स, तर खुल्या गटामध्ये गॅरॉन ग्लॅडिएटर्स संघाने विजेतेपदाला गवसणी घातली.

पुणे : महेश सेवा संघ युवा समितीतर्फे आयोजित माहेश्वरी फुटबॉल लीगच्या दुसºया सत्रात किड्स गटामध्ये व्ही नाईन रॉकर्स, तर खुल्या गटामध्ये गॅरॉन ग्लॅडिएटर्स संघाने विजेतेपदाला गवसणी घातली.‘लोकमत’ माध्यम प्रायोजक असलेली ही स्पर्धा गरवारे महाविद्यालयाजवळील सेंट्रल मॉलमध्ये झाली. यशोधन असोसिएट्स या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक होते. रविवारी झालेल्या दोन्ही गटांतील अंतिम लढती चांगल्याच रंगल्या. पेनल्टी शूटआऊटमध्ये आकृती चॅम्पियन्सचा ३-२ने पराभव करून व्ही नाईन रॉकर्सने किड्स गटाचे विजेतेपद प्राप्त केले. खुल्या गटामध्येही पेनल्टी शूटआऊटपर्यंत ताणल्या गेलेल्या निर्णायक लढतीत गॅरॉन ग्लॅडिएटर्सने पारिजात फायटर्सवर ४-३ने सरशी साधून अजिंक्यपदाचा मान मिळविला.किड्स गटामध्ये निर्धारित वेळेत दोन्ही संघ १-१ने बरोबरीत होते. पेनल्टी शूटआऊटमध्ये रॉकर्सतर्फे ईशान इंदानी आणि प्रथमेश लखोटिया यांनी केलेले गोल निर्णायक ठरले. शूट आऊटमध्ये चॅम्पियन्सतर्फे श्रवण राठी यालाच गोल करता आला. या लढतीत पीयूष सोमाणी ‘सामनावीर’ ठरला.खुल्या गटातील अंतिम फेरीत निर्धारित वेळेमध्ये ग्लॅडिएटर्स आणि फायटर्स यांच्यात २-२ अशी बरोबरी होती. पेनल्टी शूटआऊटमध्ये पुष्कर राठी आणि अर्पित मंत्री यांनी गोल करून ग्लॅडिएटर्सच्या ४-३ अशा विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. निर्धारित वेळेत २ गोल करणारा मोहित नावंदर सामन्याचा मानकरी ठरला. तिसºया स्थानासाठी झालेल्या लढतीत गीत गनर्सने प्रावा डायमण्ड्सवर २-१ने मात केली.स्पर्धेचे पारितोषिक वितरण यशोधन असोसिएट्सचे प्रमुख सुरेश नावंदर यांच्या हस्ते झाले. या वेळी शैलेश मालू, श्याम राठी, प्रवीण भरडिया, जवाहर बाहेती, महेश सेवा संघ युवा समितीचे अध्यक्ष कृष्णकांत लखोटिया, संजय बिहानी, लाहोटी होस्टेलचे अध्यक्ष राजेंद्र असावा, प्रकल्पप्रमुख अनूप करवा, सीए नंदकिशोर मालानी, शंतनू नावंदर, जुगलकिशोर तापडिया, विजय राठी, कोहिनूर इंदानी उपस्थित होते. स्पर्धेच्या यशासाठी निधी भुतडा, कल्पा लड्डा, आशिष मंत्री, सचिन मुंदडा, ललित भट्टड, धीरज मुंदडा, मुरारी मुंदडा, रवींद्र काबरा, संजय धूत, विनोद मुंदडा, आश्विन मुंदडा, दिलीप बूब, सचिन राठी, विशाल राठी, अमित भुतडा, अक्षय लड्डा यांनी परिश्रम घेतले.नीरज लखोटिया आणि अभय जाजू यांनी सूत्रसंचालन केले. महेश सेवा संघ युवा समितीचे सचिव सागर करवा यांनी आभार मानले.निकाल :- खुला गट : अंतिम फेरी : गॅरॉन ग्लॅडिएटर्स : ४ (निर्धारित वेळेत मोहित नावंदर २, पेनल्टी शूटआऊटमध्ये पुष्कर राठी, अर्पित मंत्री) विवि पारिजात फायटर्स : ३ (निर्धारित वेळेत सिद्धांत नावंदर १, यश सिकची १, पेनल्टी शूटआऊटमध्ये अमित राठी). तिसºया स्थानासाठी लढत : गीत गनर्स : २ (यश दरक १, अंकित लोहिया १) विवि प्रावा डायमण्ड्स : १ (तेजस सोनी).- किड्स गट : अंतिम फेरी : व्ही नाईन रॉकर्स : ३ (निर्धारित वेळेत प्रथमेश लखोटिया १, पेनल्टी शूटआऊटमध्ये ईशान इंदानी, प्रथमेश लखोटिया) विवि आकृती चॅम्पियन्स : २ (निर्धारित वेळेत श्रवण राठी, पेनल्टी शूटआऊटमध्ये चिरायू सारडा).वैयक्तिक पारितोषिके : अंतिम सामन्याचा मानकरी : पीयूष सोमाणी (किड्स गट), मोहित नावंदर (खुला गट). गोल्डन बूट : प्रथमेश लखोटिया (किड्स गट, ८ गोल), मोहित नावंदर (खुला गट, ९ गोल). गोल्डन ग्लोव्ह्ज : अरमान इंदानी (किड्स गट), रजत दरक (खुला गट). प्लेअर आॅफ द टूर्नामेंट : श्रवण राठी (किड्स गट), वेदांत करवा (खुला गट). 

टॅग्स :FootballफुटबॉलPuneपुणे