शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

देशातील गुन्हेगारीत महाराष्ट्र आठव्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुरोगामी महाराष्ट्रात २०१९ मध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची बाब राज्य गुन्हे अन्वेषण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : पुरोगामी महाराष्ट्रात २०१९ मध्ये महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची बाब राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) प्रकाशित करण्यात आलेल्या ‘क्राइम इन महाराष्ट्र २०१९’ या अहवालातून समोर आली आहे. २०१९ मध्ये खून, दरोडा, मालमत्तेविरोधातील गुन्ह्यांत घट झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले असून जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे म्हटले आहे.

अहवालानुसार देशातील गुन्हेगारीत महाराष्ट्र आठव्या स्थानी आहे. राज्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणाचा आढावा तसेच वास्तव मांडणाऱ्या ‘क्राइम इन महाराष्ट्र २०१९’ या अहवालाचे प्रकाशन राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते (दि.१९) शुक्रवारी झाले. विशेष महानिरीक्षक फत्तेसिंग पाटील, पोलीस अधीक्षक अशोक धिवरे, पल्लवी बर्गे, संभाजी कदम, अतिरिक्त अधीक्षक आरती बनसोडे उपस्थित होते.

देशात २०१९ मध्ये? ३२ लाख २५ हजार ७०१ गुन्हे दाखल झाले. त्यापैकी ३ लाख ४१ हजार ८४ गुन्हे महाराष्ट्रातील आहेत. २०१९ मध्ये? राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात ४.५४ टक्क्यांनी वाढ झाली असून, सर्वाधिक गुन्हे मुंबई शहरात दाखल आहेत. २०१९ मध्ये? मुंबई शहरात महिलांवरील अत्याचाराचे ६ हजार ५१९ गुन्हे दाखल आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

----------

चौकट

अमरावतीत सर्वाधिक गुन्हे

महाराष्ट्रात सर्वाधिक गुन्हे घडण्याचे प्रमाण अमरावती शहरात नोंदवले गेले आहे. तेथील गुन्ह्यांच्या आकडेवारीचे प्रमाण १४२.५५ टक्के आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये अनुसूचित जमातींवरील अत्याचारांच्या गुन्ह्यांमध्ये ८.९२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१९ मध्ये दखलपात्र गुन्हे सिद्ध करण्याचे प्रमाण ४८.९५ टक्के होते. २०१९ मध्ये राज्यात १८ हजार ९१६ जणांनी आत्महत्या केल्या. १४ हजार ६०८ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला. जबरी चोरीच्या गुन्ह्यात ४.४८ टक्क्यांनी वाढ झाल्याचे हा अहवाल सांगतो. २०१९ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत ८९१ गुन्हे दाखल झाले आहेत.

---

चौकट

गुन्हे २०१८ - २०१९

खून २, १९९ - २, १४२

दरोडा ७६९ - ६१५

जबरी चोरी ७,४३० - ७,७६३

मालमत्तेचे गुन्हे १, ३१, ५९७ - १, २२, ८४६

महिलांवरील अत्याचार ३५, ५०१ - ३७, ११२

अनुसूचित जातींवरील अत्याचार १९७४ - २,१५०

अनुसूचित जमाती ५२६ - ५५९

एकूण गुन्हे ३, ४६, २९१ - ३,४१, ८४

----