शहरं
Join us  
Trending Stories
1
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
2
लाहोर, सियालकोट, कराची अन् इस्लामाबादेत भारताचा हल्ला; स्फोटांनी पाकिस्तान हादरलं
3
“सैन्यावर विश्वास, देशाचा अभिमान, युद्ध नक्की जिंकू”; पाक कुरापतीवर J&Kतील नागरिकांना विश्वास
4
पाकिस्ताचे भारताच्या संपूर्ण पश्मिम सीमेवर हल्ले! भारताचेही जशास तसे प्रत्युत्तर; बघा कसा पाडला ड्रोन
5
India Pakistan War : भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये विध्वंस, आतापर्यंत काय-काय घडले; १० मुद्द्यांमध्ये समजून घ्या
6
पाकिस्तानचा भारतावर सायबर हल्ल्याचा डाव; 'Dance of the Hillary' व्हायरस नेमकं काय आहे?
7
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होतील; अपूर्ण कामे पूर्ण होतील
9
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
10
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
11
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
12
भारत, पाकच्या सीमा आगळ्यावेगळ्या का; ही सीमा जगात सर्वांत धोकादायक का आहे?
13
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
14
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
15
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
16
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
17
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
20
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार

महाराष्ट्र केसरी चौधरी अजिंक्य

By admin | Updated: April 28, 2015 23:35 IST

बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आयोजित केलेल्या कुस्ती आखाड्यात महाराष्ट्र केसरी विजय चौधरी याने महाराष्ट्र केसरी समाधान घोडके याच्यावर विजय मिळवून अजिंक्यपद पटकाविले.

बारामती : बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर आयोजित केलेल्या कुस्ती आखाड्यात महाराष्ट्र केसरी विजय चौधरी याने महाराष्ट्र केसरी समाधान घोडके याच्यावर विजय मिळवून अजिंक्यपद पटकाविले. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या वाढदिवसानिमित्त या कुस्ती आखाड्याचे आयोजन केले होते. जानकर यांचा वाढदिवस बारामती तालुक्यातील मूकबधीर मुलांच्या शाळेत साजरा केला. कार्यक्रमाचे आयोजन पक्षाचे जिल्हा अध्यक्ष संदीप चोपडे यांनी केले होते. कार्यक्रमासाठी दादासाहेब केसकर, आण्णासाहेब रुपनवर, रणजित सूळ, नितिन धायगुडे, पप्पु मासाळ, संपतराव टकले, चंद्रकांत वाघमोडे, बापूराव सोलनकर, तानाजी पाथरकर, अशोक माने, पोपट धवडे, हरिष खोमणे, अमोल सातकर यांनी सहकार्य केले. यावेळी आमदार महादेव जानकर, ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, रासपचे महासचिव बाळासाहेब दोडतल्ले, दशरथ राऊत, बाळासाहेब गावडे, नगरसेवक सुनिल सस्ते, पुणे प्रादेशिक बाजार समितीचे उपसभापती दिलीप खैरे, हनुमंतराव सुळ, बाळासाहेब तोंडे पाटील, बाळु बंडगर, पांडुरंग कचरे, नगरसेवक बबलू देशमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)४या कुस्ती स्पर्धेत पहिल्या लढतीत महाराष्ट्र केसरी विजय चौधरी ३ लाख ११ हजार १११ रुपये पारितोषिक पटकवले. दुसरी लढत महाराष्ट्र चॅम्पियन नंदू आबदार व राजेंद्र राजमाने यांच्यात झाली. त्यामध्ये नंदू आबदार यांनी विजय संपादन करून २ लाख ११ हजार १११ रुपये द्वितीय पारितोषिक मिळवले. तिसऱ्या लढतीमध्ये पै. भारत मदने व विजय पाटील यांच्यामधील लढत बरोबरीत सुटली. यांचे बक्षीस १ लाख ११ हजार १११ रुपये देण्यात आले. चौथी लढत राजेंद्र सुळ व संग्राम पाटील यांची लढत बरोबरीत सुटली. पाचवी लढत नितिन केचे व मारुती जाधव यांच्यामध्ये नितिन केचे विजयी झाला. सहावी लढत विलास डोईफोडे विरुद्ध देवीदास घोडके यामध्ये विलास डोईफोडे विजयी झाला. अशा प्रमुख लढतीबरोबर छोट्या मोठ्या १११ लढती झाल्या.