शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

दोन राष्ट्रीय विक्रमांसह महाराष्ट्राला तीन सुवर्ण

By admin | Updated: July 14, 2015 02:33 IST

राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण स्पर्धेत दहा वर्षाखालील मुलींच्या गटात फ्रीस्टाईल रिले स्पर्धेत महाराष्ट्राने स्वत:चाच विक्रम मोडत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद करीत

पुणे : राष्ट्रीय सब ज्युनिअर जलतरण स्पर्धेत दहा वर्षाखालील मुलींच्या गटात फ्रीस्टाईल रिले स्पर्धेत महाराष्ट्राने स्वत:चाच विक्रम मोडत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद करीत स्पर्धेचा पहिला दिवस गाजविला. तर २०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात महाराष्ट्राच्या रायना सलढाणा हिने नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली व संजिती सहा हिने ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये सुवर्ण पटकावले. वॉटरपोलो स्पर्धेत महाराष्ट्राने १८ वर्षे वयोगटात विजयी सलामी दिली. त्याचवेळी विविध ८ प्रकारात अव्वल क्रमांक पटकावत कर्नाटकने दिवसावर वर्चस्व राखले. म्हाळुंगे-बालेवाडी येथे सोमवार पासून या स्पर्धेस सुरुवात झाली. फ्रीस्टाईल रिले प्रकारात २००८ साली महाराष्ट्राच्या (२:१५:३० मि) नावे विक्रम होता. महाराष्ट्राच्या पलक धामी, संजिती साहा, इवांका शहा, अन्वेषा जोहरे (२:११:३०) यांनी नव्या विक्रमाची नोंद केली. वॉटरपोलो स्पर्धेत महाराष्ट्राने कर्नाटकचा ११-३ असा धुव्वा उडवित विजयी सलामी दिली. कर्णधार सारंग वैद्यने ५ गोल नोंदवित संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. शिवम घाडगे, यश जाधव यांनी प्रत्येकी २, तर सुयोग आमगावकर, वैभव कुटे यांनी प्रत्येकी १ गोल नोंदविला. कर्नाटक संघाकडून धनुषने तीन गोल केले. दुसऱ्या लढतीत पंजाबने मणिपूरचा ११-२ असा एकतर्फी पराभव केला. पंजाबच्या नसीब धिलॉं, देशदीप सिंग यांनी प्रत्येकी ३, कणवीरसिंगने २, भवरजित, परमपालसिंग, एकज्योतसिंग यांनी प्रत्येकी १ गोल नोंदविला. सी. एच. अजय सिंग, एल. हिल्लन मानगँग यांनी प्रत्येकी १ गोल केला. अन्य एका लढतीत केरळने दिल्लीचा १०-२ असा पराभव केला. मिधुनने ३, एल गोकुक व एस आनंद यांनी प्रत्येकी २, तर एस. प्रकाश, सिबिन व्ही, नरेंद्र पी यांनी प्रत्येकी १ गोल नोंदविला. दिल्लीकडून प्रियांक व सुनित यांनी प्रत्येकी १ गोल केला. बंगालने तेलंगानावर ९-० असा शानदार विजय नोंदविला.विक्रमी यश :२०० मीटर फ्री स्टाईल मुली : रायना सलढाणा-महाराष्ट्र (२:११:९४), अन्नई जैन-मध्यप्रदेश (२:१९:२४), भाविका डुगर-तमिळनाडू (२:२०:९६), मुले १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक : लिखित एसपी-कर्नाटका (१:०५,७५), अंश अरोरा-उत्तरप्रदेश (१:०६:३५), वैष्णव हेगडे-कर्नाटका (१:०८:२१), मुले ५० मीटर बॅकस्ट्रोक : वेदांत सेठ-दिल्ली (२७:६५), मुकुंधान पी-तमिळनाडू (२८:५५), जॅसन स्मिथ-महाराष्ट्र (२८:७९), ५० मीटर बॅकस्ट्रोक : झेव्हीयर डिसुझा-गोवा (२८:८९), नील रॉय-महाराष्ट्र (२९:४१), एन. श्री. हरी-कर्नाटका (२९:४४), ५० मीटर बॅकस्ट्रोक महिला : माना पटेल-गुजरात (३०:०३), निव्या राजा-तमिळनाडू (३१:९७), युगा बिरनाळे-महाराष्ट्र (३२:५२), ४ बाय ५० मीटर फ्रीस्टाईल मुली : महाराट्र (२:११:३०), कर्नाटका (२:१५:९२), तमिळनाडू (२:१७:४८).